शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

गडनदी धरणग्रस्तांचा मुलभूत समस्यांशी सामना

By admin | Updated: January 21, 2016 00:29 IST

कुचांबेवासीय त्रस्त : सूर्यकांत साळुंखे करणार बेमुदत उपोषण

देवरूख : कुचांबे येथे उभारण्यात येत असलेल्या गडनदी प्रकल्पासाठी प्रकल्पग्रस्तांनी सर्वतोपरी सहकार्य करूनही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. येथील धरणग्रस्तांना आजही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या सर्व समस्या तातडीने सोडवाव्यात अन्यथा १ फेब्रुुवारीपासून सूर्यकांत साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण पाटबंधारे विभागासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा राजीवली, कुटगिरी, रातांबी धरणग्रस्त ग्रामस्थ समितीने जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.मौजे कुचांबे येथे जलसंपदा विभागातर्फे गडनदी प्रकल्पाचे काम गेली ३० वर्षे सुरू आहे. आज धरणाचे काम १०० टक्के पूर्ण होत आले आहे तरीही प्रकल्पग्रस्तांची फरफट मात्र सुरूच आहे. शासन नियमानुसार आधी पुनर्वसन मग धरण, या उक्तीला हरताळ फासत पाटबंधारे विभागाने आपला मनमानी कारभार सुरू ठेवला आहे. याचा नाहक फटका प्रकल्पग्रस्तांना बसत आहे.याबाबत वारंवार प्रशासन आणि शासनाकडून पाठपुरावा सुरु आहे. मात्र त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने साळुंखे यांनी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.आगामी काळात धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासह परिसरातील सोयीसुविधांचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनामध्ये शिर्केवाडी पुनर्वसन रस्ता पूर्ण करावा, शिर्केवाडी, घाडगेवाडी गावठाणातील अपूर्ण सुविधा पूर्ण कराव्यात, राजीवली काळंबेवाडीतील सुविधांची पूर्तता व्हावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.या मागण्यांबरोबरच काळंबेवाडीतील घरांचा मोबदला अदा करण्यात यावा, ग्रामस्थांचे भुखंड सातबारे देण्यात यावेत, शिर्केवाडी पुनर्वसनात पिण्याच्या पाण्याची सोय करावी, शिर्केवाडीतील वीज जोडणीत बदल करून मिळावा, घाडगेवाडीतील निकृष्ठ कामे सुधारावी, कुटगिरी, कदमवाडी, निकमवाडी, बौध्दवाडी ग्रामस्थांना दिलेली आश्वासने पूर्ण करावीत, घाडगेवाडी रस्त्याचे नव्याने डांबरीकरण व्हावे, रस्त्याचे खोदकाम करून माती टाकून नुकसान झालेल्या शेतजमिनींचा मोबदला मिळावा, घाडगेवाडी पोच रस्त्याजवळ संरक्षक भिंंत बांधून मिळावी, स्वेच्छा पुनर्वसन धरणग्रस्तांचे शासकीय अनुदान त्वरित मिळावे, प्रकल्पग्रस्तांचा निर्वाह भत्ता मिळावा, धरणग्रस्तांना अंत्योदय रेशनकार्ड मिळावे, रिंगरोडचे काम पूर्ण करावे, राजीवली - येडगेवाडी - कावळटेक रस्ता तयार करावा, राजीवली काळंबेवाडीतील शाळेवर नियमानुसार स्लॅब टाकून मिळावा, भूमिहिन धरणग्रस्तांना जमिनी उपलब्ध करून देण्यात याव्यात या मागण्यांचा समावेश आहे.या मागण्या मान्य न झाल्यास १ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा या धरणग्रस्त ग्रामस्थ समितीने दिला आहे. (प्रतिनिधी)मागण्या मान्य करा...मागण्यांची पाटबंधारे व पुनर्वसन खाते यांनी पूर्तता करावी आणि त्यावर तातडीने कार्यवाही सुरू करावी. अन्यथा १ फेब्रुवारीपासुन सूर्यकांत साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली लघु पाटबंधारे विभाग, चिपळूणच्या आवारातच बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.नागरी सुविधांचा अभावया क्षेत्रातील राजीवली, रातांबी, पाचांबे, कुटगिरी आदी गावातील धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र, आजही त्या ठिकाणी नागरी सुविधांचा अभाव आहे. याकडे जाणुनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. वारंवार आंदोलने, उपोषण, मोर्चे काढूनही याकडे लक्ष दिले जात नाही.