शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

ब्लड बँक मोबाईल व्हॅनची संकल्पना

By admin | Updated: October 12, 2014 01:00 IST

रूग्णसेवा करणार अत्याधुनिक : सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार

४आपल्याला एवढ्या लहान वयात आमदारकीचे तिकीट मिळाले. याबाबत तुम्ही काय सांगाल? - मी जरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा सुपूत्र असलो तरी मला जी संधी मिळाली आहे, त्यामागे गेल्या ९ वर्षात आपण राज्यात स्वाभिमानी संघटनेच्या माध्यमातून केलेल्या विविध यशस्वी उपक्रमांची पोचपावती आहे, असे मला वाटते. तसेच याच कालावधीत सिंधुदुर्गात काम करत असताना आपल्याला कार्यकर्त्यांकडून खूप काही शिकता आले. एखादी निवडणूक लढवायची म्हणजे नेमके काय करावे लागते. किती तास काम करावे लागते याची जाणिव आपल्याला लहानपणापासूनच आहे. कारण राणेसाहेबांच्या गेल्या पाच निवडणुकांमध्ये ते करत असलेले काम आणि मेहनत आपण जवळून अनुभवली आहे. मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे.४आमदार होण्याअगोदरच आपण आगामी व्हिजन मांडता ही एक वेगळी संकल्पना आहे. त्यामागची नेमकी भावना काय? - खरे तर प्रत्येक लोकप्रतिनिधीने निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी आपण मतदारांसाठी आगामी पाच वर्षात काय करणार आहोत, ही संकल्पना त्यांच्यासमोर मांडली पाहिजे. नुसती संकल्पना मांडून चालणार नाही तर दर महिन्याला आपण मांडलेल्या संकल्पनेप्रमाणे काम होते की नाही याची चाचपणी केली पाहिजे. आमदारकी ही केवळ मिरविण्यासाठी असता कामा नये. ज्यावेळी लोक आपल्यावर लोकप्रतिनिधी म्हणून विश्वास टाकणार तो विश्वास सार्थकी लावण्यासाठी आपण सतत कार्यरत राहिले पाहिजे. त्यामुळे आपण पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरलो आहोत. लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी आणि माझ्या कामाची दिशा ठरवून त्यात सर्व लोकांना सामावून घेण्यासाठी आपण कणकवली, देवगड आणि वैभववाडी या मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांचे व्हिजन डॉक्युमेंटरी मांडली असून त्याला सर्व स्तरातील लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.४सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झाला, मात्र येथे काहीच झाले नाही. येथे पर्यटनवाढीसाठी तुम्ही कोणती भूमिका घेणार आहात ? - आपल्या एवढी निसर्गसृष्टी, स्वच्छ सागर किनारा परदेशातसुद्धा शोधून सापडणार नाही. मात्र, पर्यटन जिल्हा जाहीर होवून पर्यटनासाठी पायाभूत सुविधा येथे उपलब्ध न झाल्यामुळे जगभरातून पर्यटक येथे येताना विचार करतो. आलेला पर्यटक राहण्यासाठी गोव्यात जातो. कारण चांगली हॉटेल्स आणि पर्यटकांसाठी आवश्यक सुखसुविधा आपल्याकडे नाहीत. आगामी काळात पर्यटनासाठी वातावरण निर्मिती करण्याची आपली प्रमुख भूमिका असेल. त्याचहेतूने आपण सिंधुदुर्ग गाईडची संकल्पना कार्यरत केली असून त्यातून गेली काही वर्षे हजारो पर्यटक सिंधुदुर्गात दाखल होत आहेत. जिल्ह्यात ठराविक ठिकाणी आपण टुरिस्ट माहिती केंद्रांचीही उभारणी भविष्यात करणार आहे. पर्यटनक्षेत्राला चालना मिळण्यासाठी सर्व पद्धतीने प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच कोकणसाठी स्वतंत्र पर्यटन महामंडळ होण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. कारण या क्षेत्रातून हजारोंना रोजगार मिळेल. इथल्या इथे काम मिळाल्याने कामानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्यांच्या संख्येतही घट होईल आणि सुशिक्षित बेरोजगारांनीही संधी निर्माण होईल.४आपण सध्या मतदारसंघात लोकांशी थेट संवाद साधत आहात. त्यामागची कारणे कोणती? - मला या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचे आहे, तर मला मतदारसंघातील प्रत्येक गावापर्यंत पोहोचलेच पाहिजे. लोकांमध्ये मिसळून त्यांच्या समस्या थेट जाणून घेतल्यावरच आपल्याला योग्य काम करता येईल. ही या मागची प्रमुख भावना आहे. लोकांमध्ये थेट गेल्यामुळे अनेक गोष्टी आपल्यासमोर आल्या. त्यातील काही गोष्टी चांगल्या आहेत. तर काही गोष्टींमुळे मला पुढे लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना अनेक विषयांवर सखोल अभ्यास करता येणार आहे. मी माझा मतदार आणि स्वत:मध्ये कुठलीही दरी ठेवणार नाही. माझ्या मतदारांना मी ‘हक्काचा माणूस’ म्हणून केव्हाही उपलब्ध होवू शकण्यासाठीच आपण थेट लोकांपर्यंत जावून ज्यांना आवश्यक असेल त्यांना आपला मोबाईल नंबरही देत आहे.४जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारांची संख्या वाढत आहे. त्यांच्यासाठी आपले काय व्हिजन आहे? - आपण स्वाभिमान संघटनेच्यावतीने ४ मार्च २0१२ रोजी कुडाळ येथे कोकण पट्ट्यातील तरूणांना नोकरीची दुर्मीळ संधी मिळवून देणारा रोजगार मेळावा घेतला होता. यात १0 हजार तरूणांना विविध क्षेत्रात नोकऱ्या देण्यात आल्या. तसेच संघटनेच्या माध्यमातून मुंबईत नोकरी तुमच्या दारी या रोजगारविषयक अभिनव उपक्रमाची सुरूवात केली. स्वाभिमान संघटनेची ही नोकरी एक्सप्रेस मोबाईल व्हॅन राज्यातील शहरे व खेड्यापाड्यात जावून युवक व युवतींना रोजगार मिळवून देईल. सिंधुदुर्ग पर्यटनाच्या कक्षेला नवा आयाम देत सिंधुदुर्गात पर्यटकांना प्रशिक्षित गाईड मिळवून देण्याची तसेच तेथील स्थानिकांना रोजगार मिळवून देत आपल्या पायांवर उभे राहण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठीच ‘सिंधुदुर्ग गाईड’ ही संकल्पना आपण साकारली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे निसर्गसौंदर्य आणि येथील संस्कृती देशी-विदेशी पर्यटकांना जवळून अनुभवता यावी, या उद्देशाने सिंधुुदुर्ग गाईडच्यावतीने सिंधुदुर्ग गाईड डॉट कॉम हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका विश्वाला सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या ‘महाराष्ट्र कलानिधी’ या योजनेची मुहूर्तमेढ रोवली. उद्योजक, कलाक्षेत्र आणि प्रेक्षकवर्ग या त्रिमितीला जोडणाऱ्या महाराष्ट्र कलानिधीचा शुभारंभ झाला. याच महाराष्ट्र कलानिधी अंतर्गत मालवणात फिल्मसिटी उभारण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात आहेत. अशा अनेक गोष्टींवर आगामी दहा वर्षात आपल्याला सिंधुदुर्ग जिल्हा खूप पुढे न्यावयाचा आहे. त्यादृष्टीने लोकांनी आपल्यावर विश्वास टाकावा, असे आवाहन नीतेश राणे यांनी यावेळी केले.- शब्दांकन : महेश सरनाईक