शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस, शिवसेना-भाजपचे संमिश्र यश

By admin | Updated: April 24, 2015 01:31 IST

ग्रामपंचायत निकाल जाहीर : काँग्रेस २७, शिवसेना १७, भाजप १२, ग्रामविकास आघाडी १0

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक पोटनिवडणुकीत काँग्रेसने २७, शिवसेनेने १७, भारतीय जनता पक्षाने १२ तर ग्रामविकास आघाडीने १0 जागा जिंकल्या. ६६ सार्वत्रिक ग्रामपंचायत आणि ८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी गुरुवारी मतमोजणी झाली. या निवडणुकांसाठी एकूण ९४४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीत ९५,१५८ तर पोटनिवडणुकांसाठी ३0२१ असे एकूण ९८,१७९ मतदारांपैकी ६६,९८२ मतदारांनी हक्क बजावला होता. देवगड तालुक्यातील २३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कोर्ले, वरेरी या दोन ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्या असून उर्वरीत २१ ग्रामपंचायतींचा जाहीर झालेल्या निकालामध्ये ९ ग्रामपंचायती भाजपाकडे व ९ ग्रामपंचायतींवर काँग्रेस तसेच ३ ग्रामपंचायतींवर ग्रामविकास आघाडीने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. राष्ट्रवादी व शिवसेनेने कोणत्याही ग्रामपंचायतीवर स्वतंत्र अस्तित्व राखले नाही. कणकवली तालुक्यातील भिरवंडे, गांधीनगर आणि तोंडवली- बावशी या तीन ग्रामपंचायतीमध्ये भिरवंडे आणि तोंडवली- बावशी या ग्रामपंचायतीवर काँग्रेसने विजय मिळविला तर गांधीनगर ग्रामपंचायत शिवसेनेने जिंकली. मालवण तालुक्यात झालेल्या सार्वत्रिक ७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत काँग्रेसने पाच ठिकाणी आपले गड शाबूत ठेवले असतानाच चिंदर आणि मसदे या दोन ग्रामपंचायती काँग्रेसकडून हिसकावून घेत शिवसेनेने आपला भगवा फडकविला आहे. या निवडणुकीत भाजपचा चंचूप्रवेश झाला असून काँग्रेसने जिंकलेल्या ग्रामपंचायतीमध्ये मसुरे- डांगमोडे, कुणकावळे, गोळवण, कुमामे, आडवली, मालडी, पेंडूर- खरारे यांचा समावेश आहे. वैभववाडी तालुक्यातील ११ पैकी ६ ग्रामपंचायतींवर ग्रामविकास आघाड्यांनी वर्चस्व मिळविले आहे तर सोनाळी आणि आचिर्णे ग्रामपंचायतीवरील सत्ता काँग्रेसने कायम राखली आहे. वेंगसर, मांगवली आणि एडगाव या तीन ग्रामपंचायतींमध्ये भाजपाची सत्ता आली आहे. दरम्यान, ११ पैकी ६ ग्रामपंचायतींवर काँग्रेसने दावा केला आहे. सावंतवाडी तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतींपैकी सात ग्रामपंचायतींवर शिवसेनेने झेंडा फडकवत जोरदार मुसंडी मारली आहे. तर काँग्रेसने चार ग्रामपंचायतींवर विजय प्राप्त केला. या निवडणुकीत प्रस्थापितांना चांगलाच धक्का मिळाला आहे. मतमोजणीनंतर सर्वत्र विजयी मिरवणुका काढण्यात आल्या. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वेंगुर्ले तालुक्यातील आरवली व सागरतीर्थ या ग्रामपंचायतींच्या बुधवारी झालेल्या निवडणुकीत आरवली ग्रामपंचायतीवर शिवसेना पुरस्कृत आरवली विकास पॅनेलने सत्ता प्रस्थापित केली. तर सागरतीर्थ ग्रामपंचायतीवर काँगे्रस-राष्ट्रवादीच्या आघाडीने आठ जागा जिंकल्या असून शिवसेनेने फक्त एकच जागा जिंकली आहे. दोडामार्ग तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँगे्रसने कुडासे गावात आपले वर्चस्व प्रस्थापित केले. तर तेरवण मेढे येथे ग्रामविकास पॅनेलने बाजी मारले. कुडाळ तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींपैकी सहा ग्रामपंचायतींवर शिवसेनेने भगवा फडकावला. काँगे्रसला तीन ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यात यश आले. काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष प्रकाश मोर्ये, भाजपा तालुकाध्यक्ष बब्रुवान भगत व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दादा बेळणेकर यांचे पानिपत झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भुईसपाट झाला आहे. (ठिकठिकाणच्या प्रतिनिधींकडून)