शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

जनतेच्या हिताचे प्रकल्प पूर्ण करणार

By admin | Updated: May 3, 2017 23:32 IST

सुमित्रा महाजन : विकासकामासाठी मंत्री सक्षम आहेत; सीव्हीसीए कायद्यातून सवलत मिळावी; निवेदनातून मागणी

मालवण : कोकणसह महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेते, केंद्रीय मंत्री यांचे केंद्रशासनात महत्त्वाचे स्थान आहे. त्याचा वापर निश्चितच कोकणसह महाराष्ट्राच्या विकासात होणार आहे. विकास प्रक्रियेत जनतेला महत्त्वाचे स्थान आहे. आपण कधीच आश्वासने देत नाहीत. विकासकामासाठी मंत्री सक्षम असून कोकणातील जनतेच्या हिताचे रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून आवश्यक सहकार्य करण्याची ग्वाही लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या खाजगी दौऱ्यावर असलेल्या सुमित्रा महाजन यांनी बुधवारी सकाळी मालवण शहरातील मेढा जय गणेश मंदिर येथील सुवर्ण गणेशाचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी वरिष्ठ अधिकारी व त्यांचे नातेवाईक तसेच महसूल, पोलीस व अन्य प्रशासकीय यंत्रणा अधिकारी उपस्थित होते. यावेळी जयेंद्र साळगावकर व नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी महाजन यांचे स्वागत केले. सहा वर्षांपूर्वी जोतिर्भास्कर जयंत साळगावकर यांच्यासोबत मंदिराला भेट दिली होती. साळगावकर घराण्याशी आपले आपुलकीचे नाते आहे. जोतिर्भास्कर यांनी त्यावेळी ‘देशात एकहाती सत्ता येऊ देत’ असे गणेशाच्या चरणी मागणे मागितले होते. आज केंद्रात सत्ता आल्याने आपले श्रद्धास्थान असलेल्या गणेशाच्या चरणी लिन होण्यासाठी आपण जोतिर्भास्कर यांचा पुत्र जयेंद्र यांना पूर्वसूचना देत मालवणला आल्याचे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)कोकणचे ‘कोकण’पण टिकावेलांबसडक किनारे, हिरवीगार वनराई ही कोकणची ओळख आहे. कोकणचे हे अनोखे कोकणपण टिकून राहिले पाहिजे. झाडे तोडून डोंगर बोडके करुन चालणार नाही. डोंगरावर बंधारे घालून पाणी अडवले पाहिजे. झाडे जगविली पाहिजेत तसेच किनारपट्टी स्वच्छ ठेवत स्वच्छ किनारे ही कोकणची शान बनली पाहिजे, असे महाजन म्हणाल्या .केंद्रशासनाचा सागरी किनारपट्टीवर ५०० मीटर क्षेत्रात सीआरझेड कायदा लागू आहे. या कायद्यात अगदी किनाऱ्यावरील क्षेत्र सीव्हीसीए म्हणून ओळखले जाते. या क्षेत्रात बांधकाम परवानगी मंत्रालय स्तरावर मिळते. त्यामुळे या जाचक सीव्हीसीए कायद्यातून मालवण शहरास सवलत मिळावी या मागणीचे निवेदन लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिले. यावेळी नगरसेवक गणेश कुशे, आपा लुडबे, नितीन वाळके, पूजा सरकारे उपस्थित होते.