शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

राजापुरात ६९ ठिकाणचे पंचनामे पूर्ण

By admin | Updated: April 30, 2015 00:30 IST

अवकाळी पाऊस : आतापर्यंत साडेचार लाखांच्या नुकसानीची नोंद

राजापूर : दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील ६० ते ७० गावांना जबरदस्त तडाखा देणाऱ्या चक्रीवादळातील नुकसानाची पाहणी करत त्याचे पंचनामे करण्याचे काम प्रशासकीय पातळीवर जोरात सुरू असून बुधवारी दुपारपर्यंत एकूण ६९ ठिकाणचे रितसर पंचनामे झाले होते. त्या ठिकाणी झालेल्या नुकसानाची आकडेवारी ही ४ लाख ६६ हजार ७०२ एवढी होती. आणखी शंभरहून अधिक ठिकाणच्या पंचनाम्याची आकडेवारी तहसील कार्यालयाकडे प्राप्त झाली नव्हती.सोमवारी सायंकाळी उशिरा तालुक्यातील पाचल, कोंड्ये, सौंदळ, हसोळतर्फे सौंळ या तलाठी सजातील अनेक गावांना तुफानी चक्रीवादळाचा व मुसळधार पावसाचा तडाखा बसला होता. या वादळात अनेक ठिकाणी घरांची, गोठ्यांची कौले व पत्रे उडून तर अनेक ठिकाणी घरांवर लगतची झाडे कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.अचानक आलेल्या या वादळाने तालुुक्याला चांगलाच हादरा दिला असून दुर्घटनाग्रस्त गावातील पडझडीतून तेथील ग्रामस्थ अद्याप सावरलेले नाहीत. मात्र, त्या घटनेनंतर देखील ढगाळ वातावरण कायम राहिल्याने अधिक नुकसान होऊ नये म्हणून वेळीच खबरदारी घेताना अनेकांनी आपापली उडालेली छप्परे पुन्हा शाकारायला सुरुवात केली. बुधवारी दिवसभर तेच काम कायम सुरु होते.तालुक्यातील केळवली, मोरोशी, ससाळे, गोठणे दोनिवडे भागात झालेल्या नुकसानाचे ६१ पंचनामे करण्यात आले असून एकूण ४ लाख ६६ हजार ७०२ एवढे नुकसान झाल्याचा अहवाल तयार झाला आहे. उर्वरित नुकसानग्रस्त गावातील पंचनाम्यांची आकडेवारी अद्याप तहसील कार्यालयापर्यंत पोहोचलेली नसून आणखी किमान १०० च्या आसपास पंचनाम्यांची आकडेवारी अपेक्षित आहे.दरम्यान तहसीलदार गुरुनाथ हुन्नरे हे स्वत: जातीनिशी लक्ष ठेवून असून त्यांनी वेळोवेळी प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत. आगामी एक दोन दिवसात संपूर्ण तालुक्यातील झालेल्या नुकसानाचे पंचनामे व त्याची आकडेवारी तहसील कार्यालयाकडे प्राप्त होणार आहे.मागील अनेक वर्षात राजापूर तालुक्याला असा वादळाचा फटका कधी बसला नव्हता. पंधरा दिवसापूर्वी रायपाटण या गावाला वादळाने झोडपून काढले होते. (प्रतिनिधी)ग्रामस्थ संतप्तकेळवली या गावात शासकीय यंत्रणा उशिराने दाखल झाल्याने तेथील संतापलेल्या काही ग्रामस्थांनी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी व तलाठी यांना पंचनामा करण्यापासून रोखले. त्यामुळे चांगलाच पेचप्रसंग उद्भवला. अखेर तहसीलदार गुरूनाथ हुन्नरे हे पोलीस संरक्षण घेऊन केळवली गावात हजर झाले. त्यानंतर स्वत: तहसीलदार हुन्नरे यांनी समस्त ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करत त्यांची समजूत काढली व नंतर राहिलेले पंचनामे महसूलच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण केले.