शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

गणेश चतुर्थीपूर्वी पूरग्रस्त भागातील  रस्त्याचे कामे पूर्ण करा : केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 12:52 IST

पुरामुळे व अतिवृष्टीमेळे वाहून गेलेल्या व खराब झालेल्या रस्त्यांची कामे तातडीने गणेश चतुर्थीच्या 4 दिवस अगोदर पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या. सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पुर परस्थिती आढावा बैठकीवेळी पालकमंत्री केसरकर यांनी या सूचना दिल्या.

ठळक मुद्देगणेश चतुर्थीपूर्वी पूरग्रस्त भागातील रस्त्याचे कामे पूर्ण करा : केसरकरशासकीय विश्रामगृहात पुर परस्थितीचा आढावा

सिंधुदुर्ग : पुरामुळे व अतिवृष्टीमेळे वाहून गेलेल्या व खराब झालेल्या रस्त्यांची कामे तातडीने गणेश चतुर्थीच्या 4 दिवस अगोदर पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या. सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पुर परस्थिती आढावा बैठकीवेळी पालकमंत्री केसरकर यांनी या सूचना दिल्या.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षीतकुमार गेडाम, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, उप विभागीय अधिकारी कुडाळ, सावंतवाडी, आठ ही तालुक्यातील तहसिलदार, कार्यकारी अभियंता सावंतवाडी व कणकवली, लेखाधिकारी विकास पाटील, पत्तनचे कनिष्ठ अभियंता यांच्यासह संबंधित सर्व विभागाचे अधिकारी उपसिथत होते.जिल्हयातील उद्भवलेल्या अभूतपूर्व अशा पुर परिस्थितीमुळे नद्यांचे प्रवाह बदलल्याने नागरिकांचा नुकसान झाले असल्याचे सागूंन पालकमंत्री  केसरकर म्हणाले की, त्याबाबतचे प्रस्ताव तातडीने तयार करावेत. नदीने पात्र बदलल्यामुळे किती नुकसान झाले आहे त्याचे सर्वेक्षण करुन अहवाल सादर करावा. त्यासाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन मधून देण्यात यावेत.शिरशिंगे येथील गोठवेवाडीतील ग्रामस्थांचे पुनर्वसनाचे काम तातडीने पूर्ण करावे. जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी डोंगर खचण्याच्या घटना घडल्या आहेत, त्या ठिकाणी तहसिलदारांनी स्वतः पाहणी करावी तसेच पडलेल्या भेगा भरणे किंवा कसे याविषयी भूगर्भ तज्ज्ञांकडून अहवाल तयार करुन घ्यावा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.जिल्ह्यातील पूर बाधित कुटुंबांना मदतीचे वाटप जवळ जवळ पूर्ण झाले असल्याचे सांगून ज्यांना मदत मिळणे बाकी आहे त्यांना तातडीने मदत पुरवावी, कृषिचे पंचनामे पूर्ण करुन त्याविषयी कार्यवाही करावी. पुरामुळे खंडीत झालेला वीज पूरवठा सुरळीत करावा. गणपती पूर्वी ही सर्व मदत पोहचेल असे पहावे. आपतकालीन यंत्रणा उभारण्यासाठी जिल्हा नियोजन मधून निधी मंजूर करण्यात आला आहे. याविषयीची निविदा काढण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करून आपत्तकालीन यंत्रणा तातडीने उभारतील असे पहावे अशा सूचना त्यांनी केल्या. 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्ग