शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भरपाई कागपदपत्रांच्या कचाट्यात

By admin | Updated: October 6, 2015 23:50 IST

आंबा, काजू नुकसानी : अद्यापही ४२ हजार लाभार्थी वंचित, ३३ कोटींचे वाटप होणे बाकी

सिंधुदुर्गनगरी : नुकसानग्रस्त आंबा व काजू बागायतदारांसाठी आलेली भरपाईची रक्कम महसूल विभागाच्या कागदपत्रांच्या कचाट्यात सापडली असून अद्यापपर्यंत जिल्ह्यातील नुकसानग्रस्त ३७०२ लाभार्थ्यांना ४ कोटी ५९ लाख ५५ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. अद्यापपर्यंत ४२ हजार ५४१ नुकसानग्रस्त बागायतदारांना ३३ कोटी ३२ लाख १९ हजार अनुदान वाटप होणे बाकी आहे. अनुदान खात्यात जमा होण्यासाठी शेतकऱ्यांकडून संमतीपत्राची पूर्तता होत नसल्याने महसूल विभागाकडून अनुदान वाटप धिम्या गतीने होत आहे.फेब्रुवारी व मार्च या दरम्यान जिल्ह्यात ऐन आंबा आणि काजू पिकाच्या हंगामामध्ये अवकाळी पावसाने थैमान मांडत या पिकांची नुकसानी केली होती. जिल्ह्यातील आंब्याचे ६६६९ हेक्टर तर काजू पिकाचे ८४९७.१४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार समोर आले होते. त्या नुकसानीचा पंचनामा करून मदतीसाठीचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता. यात ४६ हजार २४३ बागायतदारांना याचा फटका बसत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते.त्यानुसार जून २०१५ मध्ये राज्य शासनाच्या कृषी विभागाकडे शासनाने बागायतदारांच्या नुकसानीपोटी तब्बल ३७ कोटी ९१ लाख ७ हजार रुपये अनुदान प्राप्त झाले होते. मात्र, हे अनुदान कृषी विभागाकडून वितरीत न करता महसूल विभागामार्फत अनुदान वितरीत करावे असे आदेश शासनाने दिल्याने कृषी विभागाकडे प्राप्त झालेले सर्व अनुदान प्रत्येक तालुका तहसीलदारांकडे वर्ग करण्यात आले. त्यानुसार संबंधित नुकसानग्रस्त बागायतदारांकडून बँक खाते, सातबारा व संमतीपत्र घेण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली.अनुदान प्राप्त होऊन चार महिन्यांचा कालावधी लोटला तरी प्राप्त अनुदानापैकी ३७०२ लाभार्थ्यांना ४ कोटी ५९ लाख ५५ हजार ३७६ एवढी नुकसानीपोटी रक्कम वितरीत करण्यात आली आहे. त्यामुळे केवळ १२ टक्के निधी वितरीत करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)महसूलसमोर आहेत अनेक अडचणीनुकसानग्रस्त बागायतदारांच्या सातबारावर जर एकच नाव असेल तर त्याला संमतीपत्राची आवश्यकता नाही. मात्र, एका एका सातबारावर ४० ते ५० सहहिस्सेदारांची नावे असल्यास बागायतदाराला संमतीपत्र मिळणे अवघड होऊन जाते. महसूलकडे संमतीपत्र न मिळाल्याने हे अनुदान वाटप रखडले आहे. संमतीपत्राऐवजी हमीपत्र घ्यावे अशी मागणीही काँग्रेस, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. शासनाच्या आदेशानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना (बागायतदारांना) हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान द्यावे. असे असताना महसूल विभाग प्रति हेक्टरी ७ ते ८ हजार रुपये एवढी मदत देत आहे.खर्च मार्चपूर्वी हवाआंबा आणि काजूच्या नुकसानीपोटी प्राप्त झालेल्या अनुदानापैकी अद्यापही ३३ कोटी ३२ लाख १९ हजार ६२४ रुपये अनुदानाचे वाटप होणे शिल्लक आहे. हा निधी मार्च २०१६ अखेरपर्यंत वाटप होणे आवश्यक आहे नाहीतर नुकसानग्रस्तांसाठी आलेला निधी शासनास जमा करण्याची नामुष्की महसूल विभागावर ओढवली जावू शकते.