शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

सांघिकतेने साधली आर्थिक उन्नती मळगावच्या दोन पूर्वस बचत गटाची किमया :

By admin | Updated: September 18, 2016 00:01 IST

मच्छी, कुळीथ पीठ, तांदूळ, सौंदर्य प्रसाधने विक्रीतून मिळविला नफा --महिलांचा बचतगट ६८

सावंतवाडी : महिलांच्या हाती रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे, अशी संकल्पना मनात आणून महिलांना एकत्रित आणत बचतगटाची स्थापना करण्यात आली. अत्यंत प्रभावीपणे आपली कामगिरी बजावून गटातील प्रत्येक महिलेला रोजगार मिळून सांघिकतेतून प्रगती करण्याची किमया दोन पूर्वस स्वयंसहाय्यता महिला बचतगटाने केली आहे. मळगाव कुंभार्ली-तेलकाटावाडी येथील दोन पूर्वस स्वयंसहाय्यता महिला बचतगटाची स्थापना १९ जुलै २०१४ रोजी ओंकार तुळसुलकर यांच्या समक्ष करण्यात आली. दारिद्र्यरेषेखालील दहा महिला गोळा करून बचतगटाला सुरुवात करण्यात आली. महिला सक्षमीकरणासाठी एकत्रित येत स्थापन केलेल्या या बचतगटातील सर्व महिला एकदिलाने, मनाने गेली दोन वर्षांपासून यशस्वीरीत्या वर्षाचे बारा महिने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवित असतात. त्याचबरोबर महिला सक्षमीकरणासाठी वेळोवेळी महिलांना एकत्रित आणून महिला संघटन करण्याचे काम अत्यंत प्रभावीपणे या सर्व महिला करीत असतात. सुरुवातीला १०० रुपये प्रतिमहा अशी वर्गणी काढून कार्याला सुरुवात केली. या पैशाची बचत केली. त्यानंतर पंधरा हजार रुपये फिरता निधी या बचतगटाला मिळाला. तसेच कॅनरा बँकेतून ५० हजार रुपये कर्ज घेतले. तसेच पाणलोट समितीद्वारे २५ हजार रुपयेही या महिलांना मिळाले. मिळणारे पैसे महिलांनी वाटून घेत विविध व्यवसायाला सुरुवात केली. कर्जाची परतफेड करून बँकेतही आपल्या गटाचे वजन निर्माण केले आहे.कुळीथ पीठ, मासे विक्री, तांदूळ, कोकम आगळ, सौंदर्य प्रसाधने अशा प्रकरच्या विविध वस्तूंची विक्री अशा प्रकारचे छोटे-मोठे व्यवसाय या बचतगटातून होत असतात. तसेच तयार केलेल्या साहित्याची विक्री सावंतवाडी शहराबरोबरच जिल्ह्यातही केली जाते. यातून येणारा फायदा दर एक वर्षाने बचतगटातील महिलांना वाटप केला जातो. यामध्येही आजपर्यंत महिलांनी विश्वासार्हता जपली आहे.त्याबरोबरच सावंतवाडीत कोकण, सरस, सावंतवाडी सुंदरवाडी महोत्सव तसेच मळगाव गावात होणाऱ्या क्रिकेटच्या स्पर्धा अशा कार्यक्रमातही विविध प्रकारचे स्टॉल या बचतगटांनी लावून रोजगार साधन उपलब्ध केले होते.या बचत गटात अध्यक्षा विजया विजय गवंडे, उपाध्यक्ष दीपाली दिलीप राऊळ, सचिव मानसी मंगेश निवजेकर, सदस्य यशोदा यशवंत ठाकर, गायत्री संतोष गावडे, माधुरी मोहन गवंडे, सावित्री बाबी गोसावी, निशा श्रीनिवास नाटेकर, लक्ष्मी लक्ष्मण राऊळ, रेश्मा धर्मनाथ गोसावी यांचा समावेश आहे.(प्रतिनिधी)