शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
4
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
5
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
6
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
7
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
8
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
9
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
10
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
11
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
12
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
13
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
14
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
15
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
16
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
17
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
18
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
19
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
20
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर

संगनमताने ३१ गुंठे जागेची परस्पर विक्री

By admin | Updated: May 19, 2015 00:28 IST

फणसोपमधील प्रकार : तलाठी, मंडल अधिकाऱ्यांसह चारजणांविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी : आईच्या अशिक्षीतपणाचा फायदा घेऊन तिच्यावर दबाव आणत बेकायदा वाटपपत्र तयार केले व ३१.६ गुंठे जागा संबंधितांनी आपल्या नावे केली. ही जमिन एजंटमार्फत रत्नागिरीतील प्रविण नारायण लाड याला विक्रीही करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी सुधाकर अनंत साळवी (फणसोप, टाकळेवाडी) यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सन १९९५ ते २५ सप्टेंबर २०१२ या कालावधीत हा गुन्हा घडला.फिर्यादी सुधाकर साळवी यांनी ज्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल केला आहे त्या आरोपींमध्ये सुरेश आत्माराम साळवी, १९९५ मध्ये फणसोप येथे कार्यरत असलेले तलाठी, मंडल अधिकारी पावस कांबळे, फणसोप तलाठी श्रीमती मालगुंडकर यांचा समावेश आहे.फसवून विक्री करण्यात आलेली जागा फिर्यादी सुधाकर साळवी यांचे वडील अनंत साळवी यांच्यानावे आहे. सर्व्हे क्र. २०९, हिस्सा ४७ - २४ गुंठे, सर्व्हे क्रं. २३१, हिस्सा १३ - ३.३ गुंठे, हिस्सा ३ - ४.३ गुंठे ही तीन ठिकाणची अनंत साळवी यांच्या नावे असलेली टाकळेवाडी फणसोप येथील जागा आरोपी सुरेश साळवी यांनी फिर्यादीची आई सुमती अनंत साळवी हिच्यावर दबाव टाकून संमंती वाटप पत्र तयार केले. ७/१२ वर आपली नावे टाकली. मंडळ अधिकारी पावस, कांबळे यांच्याशी संगनमताने फसवणूक करीत वाटपपत्र तयार केले. नोंदणी न करता किंवा कार्यकारी दंडाधिकारी वा नोटरी यांच्यासमोर कागदपत्र न करता २० रुपयाच्या बॉण्ड पेपरवर वाटपपत्र तयार केले. ७/१२, फेरफार करण्यासाठी मंडल अधिकारी पावस यांच्याशी संगनमत करुन आरोपीने मुळ मालकाची फसवणूक केली. ही जागा गावातीलच इस्टेट एजंट सुनील जनार्दन पिलणकर यांच्या मार्फत रत्नागिरीतील प्रविण नारायण लाड यांना विकण्यात आली. या प्रकरणी रत्नागिरी पोलीसांनी आरोपी विरोधात भारतीय दंड विधान ४२०, ४७१, ४७४, १६७, २१८, ५०७, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)आईच्या अशिक्षितपणाचा घेतला फायदा.दबाव आणत बेकायदा वाटपपत्र तयार करून ३१.६ गुंठे जमिन विकली.एजंटमार्फत केला व्यवहार.रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल.