शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक छळापासून संरक्षणासाठी समिती

By admin | Updated: April 10, 2015 00:25 IST

संतोष भोसलेंची माहिती : वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांची अध्यक्षपदी निवड करणार

सिंधुदुर्गनगरी : कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून संरक्षण व्हावे तसेच याबाबतच्या तक्रारीचे निवारण व्हावे याकरिता १० किंवा १० पेक्षा अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या सर्व प्रकारच्या शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, अशासकीय संस्था, उद्योग, असंघटित क्षेत्रातील कामगार व कायद्यात नमूद इतर सर्व आस्थापनांवर अंतर्गत तक्रार समितीचे गठन करावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी आवाहन केले आहे. त्यानुसार या समितीवर संबंधित कार्यालयातील वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संतोष भोसले यांनी बुधवारी प्रसिद्धीपत्रकातून दिली.तथापि, वरिष्ठ महिला अधिकारी किंवा कर्मचारी उपलब्ध नसेल तर इतर कार्यालये, प्रशासकीय विभाग जी विविध ठिकाणी म्हणजे विभाग किंवा उपविभाग स्तरावर कार्यरत आहेत अशा कार्यालयातील उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करावी. तसेच कामाच्या ठिकाणी असणाऱ्या इतर कार्यालयात किंवा प्रशासकीय विभागातही वरिष्ठ स्तरावरील महिला अधिकारी, कर्मचारी उपलब्ध होत नसेल तर त्याच नियुक्तींच्या अन्य कोणत्याही कामाच्या ठिकाणाहून किंवा इतर विभागातून किंवा खासगी क्षेत्रात इतर संघटनेतील अध्यक्ष पदस्थ महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करता येईल, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी दिली आहे.या समितीमध्ये प्राधान्याने महिलांच्या सोयीसाठी बांधील असलेल्या किंवा ज्यांना सामाजिक कार्याचा अनुभव आहे किंवा ज्यांना कायद्याचे ज्ञान आहे, अशा कर्मचाऱ्यांमधून किमान सदस्य नियुक्त करावेत. तसेच महिलांच्या प्रश्नांशी बांधील असलेल्या अशासकीय संघटना किंवा लैंगिक छळाशी संबंधित प्रश्नांशी परिचित असलेली व्यक्ती, यामधील एक सदस्य असावा. तथापि, अशारितीने नामनिर्देश करावयाच्या एकूण सदस्यांपैकी ५० टक्के सदस्य या महिला असाव्यात. याशिवाय अंतर्गत तक्रार समितीचे अध्यक्ष आणि प्रत्येक सदस्य यांची कार्यालय प्रमुखाकडून नियुक्ती करण्यात येईल व त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून ३ वर्षाहून अधिक नसेल इतक्या कालावधीसाठी ते पद धारण करता येईल, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी कळविली आहे. (प्रतिनिधी)