शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबार्इंचे स्वप्न साकार करा : भुस्कुटे

By admin | Updated: March 16, 2015 00:10 IST

मुलींना मोफत शिक्षण मिळते पण पुढील शिक्षणासाठी पैशाची अडचण आल्यास पैशाअभावी तुमचे शिक्षण थांबणार नाही याची काळजी मी घेईन, असे आश्वासन अशोक भुस्कुटे यांनी दिले.

चिपळूण : सावित्रीच्या लेकी तुम्ही खूप शिका! आणि सावित्रीबाईंचे स्वप्न साकार करा असे उद्गार स्वातंत्र्यसैनिक सिंधुताई भुस्कुटे यांनी काढले. दरवर्षीप्रमाणे सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी म्हणजेच नायगांव (खंडाळा) जिल्हा सातारा येथे दुर्गाशक्ती चिपळूणतर्फे जिल्हा परिषद शाळेतील सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींसाठी मोफत सहल आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या.जिल्हा परिषद शाळेतील सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींमध्ये आठवीत प्रवेश घेण्यासाठी आत्मविश्वास जागृत करणे व किमान १० वी व १२ वीपर्यंत शिक्षण घेवून त्यांना करिअर निवडून त्यात यश संपादन करून आत्मनिर्भर व्हावे, यासाठी या पे्ररणासहलीचे आयोजन करण्यात येते, असे दुर्गाशक्तीच्या अध्यक्षा अश्विनी भुस्कुटे यांनी सांगितले़दुर्गाशक्तीच्या कार्याबाबतची माहिती तसेच सावित्रीबार्ईंचे कार्य याबाबत सचिव सेजल कारेकर यांनी माहिती दिली़ चालक हेमंत भोसले यांनी सहलीदरम्यान घ्यावयाची काळजी, निरीक्षण कसे करावे व सहल पर्यावरणपुरक होण्यासाठी घ्यावायाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले़ सहलीस निरोप देण्यासाठी रसिका देवळेकर, रश्मी मोरे, स्वाती गुप्ते, वनिता दाभोळे, वसुंधरा पाटील या उपस्थित होत्या़ सहलीसोबत स्वातंत्र-सैनिक भुस्कुटे, श्वेता राव, अमृता भुस्कुटे व मधुरा केतन खांडेकर (वाहक) उपस्थित होत्या़ पेठमाप मराठी, उक्ताड, खेंड मुलांची, पागकन्या आणि मापारी ऊर्दू शाळेतील ४८ विद्यार्थिनी व शिक्षिकांनी सहभाग घेतला़ वाहक होण्यासाठी किती शिक्षण आवश्यक आहे, याबाबत माहिती मधुरा खांडेकर यांनी दिली़ मुलींना मोफत शिक्षण मिळते पण पुढील शिक्षणासाठी पैशाची अडचण आल्यास पैशाअभावी तुमचे शिक्षण थांबणार नाही याची काळजी मी घेईन, असे आश्वासन अशोक भुस्कुटे यांनी दिले.नायगांव येथे सावित्रीबाई व महात्मा फुले यांची जीवनसृष्टी मुलींना दाखवण्यात आली़ शिक्षिका मिना गोगटे यांनी सहल आयोजकांचे आभार मानले़ (वार्ताहर)