शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
3
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
4
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
5
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
6
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
7
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
8
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
9
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
10
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
11
केंद्रात नोकरीसाठी मुलाखत दिलेले ६४% उमेदवार अपात्र 
12
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
13
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
14
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
15
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
16
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
17
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
19
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
20
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान

सत्ताधारी नगरसेवकांत कलगीतुरा

By admin | Updated: August 13, 2015 23:10 IST

गटनेते पदाचा वाद : कणकवली नगरपंचायत विषय समिती सदस्य निवड

कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्या विषय समितीच्या सदस्य निवडीच्यावेळी सत्ताधाऱ्यांमध्येच गटनेता निवडीवरून कलगीतुरा रंगला. त्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये दोन गट असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, सभापती निवडीसाठी पिठासीन अधिकारी प्रांताधिकारी संतोष भिसे यांनी आपल्या अधिकाराचा उपयोग करून सत्ताधाऱ्यांचे दोन गट तर विरोधकांच्या एका गटातील नगरसेवकांची विषय समितीच्या सदस्य म्हणून निवड केली. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी विषय समिती सभापती निवड करण्यात येणार आहे. विरोधी नगरसेवक ज्या गटाला समर्थन देतील त्या गटाचा सभापती विराजमान होणार आहे. येथील नगरपंचायतीच्या सार्वजनिक बांधकाम समिती, महिला व बालकल्याण समिती, पाणीपुरवठा व जलनिस्सारण तसेच बाजार समिती आणि आरोग्य समितीच्या सभापतींची मुदत संपत असल्याने गुरुवारी या समितीच्या सदस्यांची निवड करण्यासाठी नगरपंचायतीच्या प.पू. भालचंद्र महाराज सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या निवडणूक प्रक्रियेसाठी पिठासीन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी संतोष भिसे उपस्थित होते. मुख्याधिकारी अवधुत तावडे यांच्यासह नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत, उपनगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह इतर सदस्यही यावेळी उपस्थित होते. नगरपंचायतीत सत्ताधारी काँग्रेसचे १३ सदस्य आहेत. तर शिवसेनेचे ३ व भाजपाचा १ सदस्य आहे. सभापती निवडीसाठी सदस्यांचा गट स्थापन करून त्यांचा गटनेता हा सदस्यांची नावे पिठासीन अधिकाऱ्यांसमोर सादर करतो. काँग्रेसच्या रूपेश नार्वेकर तसेच समीर नलावडे या दोघांकडूनही गटनेत्यासाठीची पत्रे अधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात आली. विषय समिती सदस्य पदासाठी आपल्या गटातील नगरसेवकांची नावेही देण्यात आली. त्यामुळे काँग्रेसचा अधिकृत गट कोणता? असा प्रश्न निर्माण झाला. यावरुन दोन्ही गटात जोरदार वादावादी झाली. काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी उपनगराध्यक्ष समीर नलावडे यांना सभापती निवड प्र्रक्रियेसाठी गटनेता नियुक्त करण्यात येत असल्याचे पत्र दिले होते. ते पीठासीन अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले. या पत्रासोबत अभी मुसळे, बंडू हर्णे, सुविधा साटम, किशोर राणे, गौतम खुडकर, माया सांब्रेकर आणि समीर नलावडे अशा सात सदस्यांच्या सह्या असलेला कागद होता. तर रूपेश नार्वेकर यांनी सादर केलेल्या पत्रासोबत नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत, मेघा गांगण, सुमेधा अंधारी, माधुरी गायकवाड, कन्हैया पारकर आणि रूपेश नार्वेकर अशा सहा सदस्यांच्या सह्या असेला कागद जोडण्यात आला होता. या दोघांकडूनही गटनेता आपण असल्याचे सांगण्यात येत असल्यामुळे वाद निर्माण झाला. यामध्ये हस्तक्षेप करीत अधिकाऱ्यांनी तुमचे गट जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदणीकृत आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच वाद क्षमविण्यासाठी पीठासीन अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून आपल्या अधिकाराचा वापर करत विषय समितीसाठी सदस्यांची नावे जाहीर केली. यामध्ये महिला व बालकल्याण समितीसाठी सुविधा साटम, मेघा गांगण, सुमेधा अंधारी, नंदीनी धुमाळे, सार्वजनिक बांधकाम समितीसाठी राधाकृष्ण उर्फ रुपेश नार्वेकर, गणेश हर्णे, कन्हैया पारकर, अभी मुसळे व सुशांत नाईक तर आरोग्य समितीसाठी गौतम खुडकर, मेघा गांगण, माधुरी गायकवाड, राजश्री धुमाळे व किशोर राणे तर पाणीपुरवठा समितीसाठी समीर नलावडे, कन्हैया पारकर, सुमेधा अंधारी, माधुरी गायकवाड, राजश्री धुमाळे यांचा समावेश होता. विषय समितीच्या अध्यक्षपदासाठी उमेदवाराचे नाव सुचविताना एक सूचक व एक अनुमोदक आवश्यक असतो. त्यामुळे सभापती निवडीच्या वेळी या निकषाची पूर्तता करु शकणाऱ्याच गटाचा सभापती होणार आहे. यामुळे विरोधी नगरसेवकांची भूमिका सभापती निवडीमध्ये महत्त्वपूर्ण राहणार आहे. पाणी पुरवठा समितीच्या अध्यक्षपदी उपनगराध्यक्ष हे पदसिद्ध सभापती असतात. त्यामुळे त्या समितीच्या सभापती पदाचा मान समीर नलावडे यांना मिळणार आहे. (वार्ताहर)हरकत नोंदविणारनगरपंचायत सभापती निवडीवेळी गटनेतेपद हे त्या वेळी ठरविले जात होते. ते त्याच प्रक्रियेपुरते मर्यादित असायचे. एखादा सदस्य आपला गटनेता असल्याचे पत्र इतर सदस्य आपल्या सहीने पीठासीन अधिकाऱ्यांसमोर सादर करीत असतात. या आधीच्या निवडणुकांमध्ये रूपेश नार्वेकर हे गटनेते होते. मात्र यावेळी जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी आपणाला गटनेतेपद म्हणून घोषीत केले आहे. तसे पत्रही त्यांनी दिले असून त्यावर सात सदस्यांच्या सह्या आहेत. यापूर्वी असा प्रसंग न उद्भवल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे गटाची नोंदणी करण्याचा प्रश्नच निर्माण झालेला नव्हता. जाहीर केलेल्या सदस्यांची नावे मान्य नसल्याने याबाबत आम्ही नगरपंचायत अ‍ॅक्टनुसार जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकत नोंदविणार असल्याचे नलावडे यांनी सांगितले.या आधीच्या निवडणुकांच्या वेळी रूपेश नार्वेकर हे आमचे गटनेते होते. त्यामुळे त्यांनी गटनेत्यासाठीचे पत्र आणल्यानंतर आम्ही सदस्य म्हणून त्यावर सह्या केल्या. मात्र, पक्षातर्फे समीर नलावडे यांना दिलेल्या पत्राबद्दल आम्हाला काहीच माहिती नव्हती. रूपेश नार्वेकर यांच्या पत्रावर आधीच सही केलेली असल्याने नलावडे यांच्या पत्रावर आमची सही झाली असती तर तांत्रिक अडचण निर्माण झाली असती. यासाठीच समीर नलावडे यांच्या पत्रावर सह्या केल्या नाहीत. आम्ही काँग्रेसचेच नगरसेवक असून या आधीही व यानंतरही नारायण राणेंचेच नेतृत्व आमच्यासाठी अंतिम असेल असे नगराध्यक्षा प्रज्ञा खोत व मेघा गांगण यांनी स्पष्ट केले.