शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

महाविद्यालयीन प्रवेशाचा घोळ

By admin | Updated: August 11, 2015 23:24 IST

अ‍ॅडमिशन न मिळाल्यास सेनेचे उपोषण : शिवसेना, कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांचा प्राचार्यांना जाब

कणकवली : कॉलेज प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिवसेना आणि कॉँग्रेसचे पदाधिकारी मंगळवारी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना भिडले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी १५ आॅगस्टपर्यंत योग्य निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला तर कॉँग्रेस नगरसेवकांनी अतिरिक्त प्रवेशासंदर्भातील पत्र घेऊनच प्राचार्यांना पुढील प्रक्रिया करण्यासाठी आग्रह धरला. कणकवली महाविद्यालयात प्रथम वर्ष वाणिज्य शाखेसाठी अतिरीक्त जागांना मंजुरी मिळण्याच्या शक्यतेवर प्रवेश देण्यात आला होता. मात्र, मंजूर जागा भरल्याने महिनाभरानंतर काही विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क परत करून २२ विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्यात आला. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी कणकवली महाविद्यालयात धाव घेतली. प्राचार्य डॉ. संभाजी शिंदे यांची भेट घेत वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश न मिळाल्यास स्वातंत्र्यदिनी महाविद्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख राजू राणे, प्रथमेश सावंत, युवा सेना तालुकाप्रमुख राजू राठोड आदी पदाधिकाऱ्यांनी प्राचार्य शिंदे यांची भेट घेऊन जाब विचारला. प्राचार्य शिंदे यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अतिरिक्त तुकडीला मान्यता देण्याचे आश्वासन पाळलेले नाही. तात्पुरते अ‍ॅडमिशन देण्यात आले होते. मात्र, विद्यापीठाच्या मंजूर जागांपेक्षा जास्त प्रवेश देऊ शकत नाही. विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेले शुल्क परत करण्यात आले आहे. तुम्ही सत्तेत आहात तर तुम्ही प्रश्न सोडवा, असे सांगितले. रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जात असल्याचा प्रथमेश सावंत यांनी आरोप केला. ते म्हणाले की, ५० टक्के गुण असलेल्यांना प्रवेश मिळत असून ९० टक्केवाल्यांना का नाही? असा प्रश्न करत सत्तेत राहून आंदोलन करावे लागत आहे हे दुर्दैवी आहे.शिक्षणमंत्री तावडे यांचा आम्ही निषेध करत असून १५ आॅगस्टपर्यंत योग्य निर्णय न झाल्यास कॉलेज समोर उपोषण केले जाईल, असा इशारा राजू राणे यांनी दिला. कॉँग्रेस नगरसेवकांनी पत्र दाखवले शिवसेनेचे पदाधिकारी जाताच विद्यार्थ्यांचा प्रश्न घेऊन कॉँग्रेसचे नगरसेवक कन्हैया पारकर, रूपेश नार्वेकर, गौतम खुडकर हे प्राचार्यांच्या दालनात दाखल झाले. विद्यापीठाने प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांची यादी पाठवण्यासाठी जारी केलेले पत्रच यावेळी नगरसेवक खुडकर यांनी सादर केले. मात्र, प्राचार्यांनी असे पत्र अद्याप आपणास प्राप्त झाले नसल्याचे सांगितले. या पत्रानुसार १४ आॅगस्टपर्यंत अतिरिक्त विद्यार्थ्यांची यादी पाठवण्याचे विद्यापीठाने कळविलेले आहे. ही चर्चा सुरू असताना कर्मचाऱ्याने महाविद्यालयास प्राप्त पत्र आणून दाखवले. अधीक्षक रंजन राणे हे जाग्यावर नसल्याने पत्र मिळाले नाही. आता अतिरिक्त विद्यार्थ्यांची यादी पाठवतो, असे प्राचार्य शिंदे यांनी सांगितले. प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या २२ एवढी सांगितली जात असली तरी महाविद्यालयाच्या ढिसाळ कारभारामुळे यापेक्षा मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिलेले आहेत, असा आरोप नगरसेवक खुडकर यांनी यावेळी केला. (प्रतिनिधी)