मालवण : केंद्र्रीय पर्यावरण तथा वन व हवामान विभाग सचिव सुशीलकुमार हे दोन दिवसाच्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. किनारपट्टीवरील युएनडीपी प्रकल्प तसेच किनारपट्टी भागाचा दौरा करताना पर्यावरणाचा समतोल साधून समुद्र्री व किनारपट्टीवरील पर्यटनाचा होणारा विकास व या अनुषंगाने निगडीत घटकांचा पाहणी अभ्यास करण्यात येणार आहे. शनिवारी सायंकाळी केंद्र शासनाची टीम मालवण एमटीडीसी स्कुबा डायव्हिंग सेंटर येथे दाखल झाली. रविवारी देवगड व वेंगुर्ले याठिकाणचाही दौरा करण्यात येणार आहे. मालवण स्कुबा डायव्हिंग सेंटर येथे दाखल झालेल्या या टीमसोबत एमओइएफचे होलिंग झु, सहाय्यक सचिव प्रवीण परदेसी यासह महाराष्ट्र राज्याचे सचिव, युएनडीपी, वनविभागाचे अधिकारी, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, प्रांताधिकारी रवींद्र बोंबले, तहसीलदार वनिता पाटील यासह पर्यावरण वन व युएनडीपी विभागाचे प्रमुख यावेळी उपस्थित होते. स्कुबा डायव्हिंग सेंटर येथील इस्दाचे प्रमुख सारंग कुलकर्णी, यांच्यावतीने स्कुबा डायव्हिंग सेंटरची माहिती देताना अधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. स्कुबा डायव्हिंग येथे नव्याने प्रशिक्षण घेतलेल्या तज्ञ युवा प्रशिक्षणार्थिनी या टीमचे स्वागत केले. खेकडा शेती, नवीन पर्यटन स्थळांची निर्मिती होताना पर्यावरणाचा राखण्यात येणारा समतोल व अन्य बाबींवर यावेळी चर्चा करण्यात आली. तर प्रशिक्षणार्थिना प्रमाणपत्र वितरण केले. (प्रतिनिधी)
पर्यावरण टीमचा किनारपट्टी दौरा
By admin | Updated: April 3, 2016 03:50 IST