शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

कोयनेत अजूनही २९ टक्के पाणीसाठा..!

By admin | Updated: June 13, 2015 00:25 IST

गत वर्षीच्या तुलनेत दुप्पट : सर्वच धरणांची समाधानकारक स्थिती

जगदीश कोष्टी -सातारा  जिल्ह्यात मान्सूनचे आगमन दरवर्षी सरासरी ७ जूनला होते. यंदा मात्र १२ जून उजडला तरी म्हणावा असा पाऊस पडला नाही. त्यामुळे अनेकांना चिंता सतावत असली तरी जिल्ह्यातील जलसाठे समाधानकारक आहेत. सर्वच धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त पाणी आहे. कोयना धरणात ३०.४५ टीएमसी पाणी असून, गेल्या वर्षी याच दिवशी अवघा १५.४७ टीएमसी होते.सातारा जिल्ह्याला लाभलेल्या नैसर्गिक वरदानामुळे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असतो. त्यामुळे महाबळेश्वर, वाई, सातारा, जावळी, पाटण तालुके हे अती पावसाचे म्हणून ओळखले जातात. या तालुक्यातही यंदा फारसा पाऊस झालेला नाही. या पाच जिल्ह्यांच्या अगदी उलटस्थिती असलेल्या माण, खटाव, फलटण व खंडाळा तालुक्यांचा काही भाग दुष्काळी म्हणून ओळखला जातो. या भागात नेहमी परतीचा पाऊस पडतो. मात्र, यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यातच या दुष्काळी तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. यामुळे यंदा पावसाचे कसे होणार हा प्रश्न बळीराजापुढे उभा आहे.जिल्ह्यात पडत असलेल्या पावसाचा थेंबन्थेंब अडविण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर प्रकल्प उभारले गेले. त्यामुळे मुबलक प्रमाणावर पाणीसाठा होत असल्याने जिल्ह्याबरोबरच शेजारच्या जिल्ह्याचीही तहान सातारा भागवत आहे. या सर्वच धरणांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा जास्त पाणीसाठे आहेत. कण्हेर आणि तारळी धरणाचा याला अपवाद आहे. जिल्ह्यातील धरणे व त्यात असलेले पाणी टीएमसीमध्ये (कंसात गेल्या वर्षी १२ जून रोजी) असा : कोयना ३०.४५ (१५.४७), धोम ३.५० (३.३९), कण्हेर २.८५ (३.२८), धोम-बलकवडी ०.३४ (०.३३), उरमोडी ६.७१ (५.१३), तारळे २.४८ (४.१०), येरळवाडी ०.५९ (०.३२), मोरणा ०.६७ (०.१८), उत्तरमांड ०.३९ (०.३७), नागेवाडी ०.१५ (०.१४), महू ०.०५ (०.०४), हातगेघर (०.०३१) (०.०११).तालुकानिहाय पाऊस (मिमी)तालुका२०१५२०१४सातारा ३३.९३९.०७जावळी२८.२३०.७पाटण४५.४५२.६कराड४५.२५५.६कोेरेगाव३१.४३८.८खटाव६४.८५६.०माण९७.७२८.४फलटण४४.०३४.५खंडाळा५६.०३८.६वाई१५.६२१.७महाबळेश्वर६७.८४.३एकूण५३०४००.९पाऊसही नाही मागेजिल्ह्यात सध्या पांढरा कापूस पिंजून ठेवल्यासारखे पांढरे ढग येत आहेत. काळे ढग संध्याकाळी जमा होतात अन् निघूनही जातात. त्यामुळे अनेकांच्या नजरा वरुणराजाकडे लागल्या असल्या तरी चिंतेचे कारण नाही, असे आकडेवारी सांगतात. गेल्या वर्षीच्या तुलनेत आजच्या तारखेला पाऊसही चांगलाच झाला आहे. जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत ५३० मिलीमीटर पाऊस पडला आहे. गेल्या वर्षी या दिवसाअखेर अवघा ४००.९ मिलीमीटर झाला होता.