शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

सहायक गटविकास अधिकाऱ्यांना घेराव

By admin | Updated: April 26, 2016 00:36 IST

आर्चिणे ग्रामस्थ आक्रमक : महाराष्ट्र ग्रामीणचे काम ग्रामसेवकाने थांबविले, मजुरीही थकीत

वैभववाडी : ‘महाराष्ट्र ग्रामीण’ रोजगार हमी योजनेतून मंजूर असलेले आर्चिणे- धनगरवाडा रस्त्याचे काम उपसरपंचांच्या हरकतीवरून ग्रामसेवकाने थांबविल्यामुळे धनगरवाड्याच्या संतप्त ग्रामस्थांनी सहायक गटविकास अधिकारी मिलिंद जाधव यांना घेराव घातला. त्यावेळी जाधव यांनी ग्रामसेवक एस. एस. कदम यांना धारेवर धरत तातडीने काम सुरू करण्याचे तसेच थकीत मजुरीही तातडीने देण्याचे आदेश दिले.आर्चिणे-धनगरवाडा ही वस्ती गावापासून सुमारे साडेचार किलोमीटरवर असून, तेथे बारमाही रस्ता नसल्यामुळे महाराष्ट्र ग्रामीण योजनेतून सुमारे साडेचार लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्या कामावर धनगरवाडा येथील मजूर काम करीत होते. या मजुरांना गेल्या दीड महिन्यांची मजुरीच दिलेली नाही. तरीही मजूर ‘महाराष्ट्र ग्रामीण’चे काम करीत असताना चक्क ग्रामसेवकाने या रस्त्याचे काम थांबविले. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी दुपारी पंचायत समितीत धाव घेत संतोष बोडके यांच्या नेतृत्वाखाली सहायक गटविकास अधिकारी जाधव यांना घेराव घातला.केवळ गरज म्हणून दीड महिना मजुरी मिळालेली नसतानासुध्दा आमचे लोक रस्त्यावर काम करीत होते; परंतु ग्रामसेवक कदम यांनीच आम्हाला महाराष्ट्र ग्रामीणचे काम थांबविण्यास सांगितले, अशी तक्रार सहायक गटविकास अधिकारी जाधव यांच्याकडे आर्चिणे धनगरवाड्याच्या ग्रामस्थांनी केली. त्यावेळी जाधव यांनी एकतर महाराष्ट्र ग्रामीणची कामे होत नाहीत; आणि तुम्ही सुरू असलेले काम का थांबविता? असा प्रश्न उपस्थित करून जाधव यांनी ग्रामसेवक कदम यांना धारेवर धरले. त्यावेळी जमीन मालकांची हरकत असल्याचे सांगून कदम यांनी स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. कदम यांचे स्पष्टीकरण ऐकून आर्चिणे धनगरवाड्याचे ग्रामस्थ संतापले. २00१ मध्ये ग्रामपंचायत दप्तरी २६ नंबर रजिस्टरला नोंद झालेल्या रस्त्यावर जमीन मालकांची हरकत येतेच कशी? असा सवाल करून लेखी हरकत असेल, तर आम्हाला ग्रामपंचायतीमार्फत तसे पत्र द्या, अशी मागणी त्यांनी केली. त्यावेळी जाधव यांनी कदम यांना तुम्ही ग्रामपंचायत अधिनियम डावलून काम का करता? अशी विचारणा करीत थांबविलेले काम तत्काळ सुरूकरा. तसेच दीड महिन्यांची थकीत मजुरीही तातडीने देण्याचे आदेश जाधव यांनी दिले. यावेळी संतोष बोडके, रमेश झोरे, विठ्ठल हुंबे, बाबू गुरखे, वाघोबा झोरे, राजाराम शिंगाडे, जनार्दन शिंगाडे, राजाराम झोरे, जनार्दन झोरे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते. उपसरपंचांच्या हरकतीमुळे काम थांबविले : कदमआर्चिणे धनगरवाडा रस्त्याचे काम ‘महाराष्ट्र ग्रामीण’मधून मंजूर असून, या कामाला ७ मार्चला सुरुवात झाली आहे. धनगरवाड्यावरील नऊ जॉबकार्डधारक मजूर रस्त्यावर काम करीत आहेत. त्यांच्या मजुरीचा एक हप्ता खात्यात जमा केला असून, ४४ दिवसांची मजुरी देय आहे. मात्र, उपसरपंच सुशीलकुमार रावराणे यांनी आपल्या जमिनीतून रस्ता नेण्यास हरकत घेतल्यामुळे आपण हे काम थांबविले आहे, असे स्पष्टीकरण ग्रामसेवक एस. एस. कदम यांनी सहायक गटविकास अधिकारी मिलिंद जाधव यांना दिले. त्यावर २६ नंबरला नोंद असलेल्या रस्त्यावर जमीन मालकाच्या हरकतीचा प्रश्न येतोच कुठे? असा जाधव यांनी प्रश्न उपस्थित केल्याने कदम निरुत्तर झाले.