शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

मालवणात ढगफुटीसदृश पाऊस; डोंगर खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 00:11 IST

सिंधुदुर्ग/मुंबई : कोकण किनारपट्टीवर सक्रिय झालेला मान्सून बुधवारी सलग तिसऱ्या दिवशीही संततधार बरसत आहे. मालवणात तर तो ढगफुटीसदृश कोसळला. यामुळे शहरासह लगतच्या गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. अनेक घरांमध्ये गुडघाभर पाणी घुसल्याने अनेकांचे संसार पाण्यावर तरंगत होते. शहरातील एका भंगार व्यावसायिकांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळून घर जमिनदोस्त झाले. यात चारजण ...

सिंधुदुर्ग/मुंबई : कोकण किनारपट्टीवर सक्रिय झालेला मान्सून बुधवारी सलग तिसऱ्या दिवशीही संततधार बरसत आहे. मालवणात तर तो ढगफुटीसदृश कोसळला. यामुळे शहरासह लगतच्या गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. अनेक घरांमध्ये गुडघाभर पाणी घुसल्याने अनेकांचे संसार पाण्यावर तरंगत होते. शहरातील एका भंगार व्यावसायिकांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळून घर जमिनदोस्त झाले. यात चारजण जखमी झाले. यातील एकजण गंभीर आहे. तालुक्यातील देवली येथे डोंगर खचला आहे.दरम्यान, सलग कोसळणाºया पावसामुळे दलदलयुक्त जमीन होऊन अनेक ठिकाणी झाडे उन्मळून कोसळत आहेत. मालवणात आठवडाभरात दुसºयांदा ३४५ मिलीमीटर इतका विक्रमी पाऊस पडला असून, आतापर्यंत १५२६ मिलीमीटर पावसाची नोंद तहसीलदार कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात करण्यात आली आहे. बुधवारी सायंकाळपासून पावसाने रौद्ररूप धारण केल्याने मालवण तालुक्यातील खालची देवली येथील कुलस्वामिनी मंदिरानजीक डोंगर खचला. यात डोंगराची माती देवली मार्गावरील रस्त्यावर आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद होती.मालवण शहरातील बांगीवाडा परिसरात भंगार व्यावसायिक राफातुल्ला खान यांच्या घरात गेली अनेक वर्षे भंगार व्यावसायिक राहतात. बुधवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ९ जण झोपण्याच्या तयारीत असताना झाड घरावरच कोसळले. लगेच सर्व सदस्यांनी घराबाहेर धाव घेतली. मात्र, घराचे छप्पर अंगावर कोसळून इम्रान खान यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. तर अंगद शर्मा, रामराज शर्मा, आबीद अली व एक छोटा मुलगा इरशाद खान यांना दुखापत झाली. मध्यरात्री भर पावसात जखमींना रुग्णालयात दाखल केले. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. घर कोसळून हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.वेंगुर्ले तालुक्यातील मायणे, खडपेवाडी येथील अनुसया चिपकर यांच्या घराभोवती पाणी साचल्याने त्यांना स्थलांतराची नोटीस देण्यात आली आहे. वडखोल कॅम्प वेंगुर्ला येथील कृष्णा सावंत यांच्या घरावर दरडीचा दगड कोसळून घराची पडवी, शौचालय व बाथरुमचे नुकसान झाले. तर तुळस येथील संतोष घोगळ यांच्या घरावर चिंचेचे झाड कोसळल्याने सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.निवती येथे नऊजणांना वाचविलेकोचरा निवती येथे घराला पुराच्या पाण्याने वेढल्याने ९ माणसे अडकली होती. वेंगुर्ले तहसीलदार, तालुक्यातील शोध व बचाव गट आणि स्थानिक मच्छिमारांच्या सहाय्याने त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. ही माणसे केरकर कुटुंबातील असून त्यांना तेथीलच कोचरेकर यांच्या घरी स्थलांतरित करण्यात आले आहे. हे बचावकार्य २१ जून रोजी मध्यरात्री बारा ते पहाटे ४ वाजेपर्यंत सुरू होते, अशी माहिती जिल्हा नियंत्रण कक्षामार्फत देण्यात आली.खवणेत नऊ घरांमध्ये ओहोळाचे पाणीवेंगुर्ले तालुक्यातील खवणे येथील गाबीतवाडा येथे ९ घरांमध्ये ओहोळाचे पाणी शिरून घरातील भांडी वाहून गेली. तसेच घरातील अन्नधान्य भिजून सुमारे ५५ हजार रुपयांचे नुकसान झाले. रामा गुणकर यांची भिंत कोसळून सुमारे १२ हजार रुपयांचे नुकसान झाले. म्हापण-निवती रस्ता येथील पूल खचून रस्त्याचे नुकसान झाले आहे.