शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

४३२ ग्रामपंचायतींमध्ये एकाचवेळी स्वच्छता

By admin | Updated: October 29, 2015 00:08 IST

जिल्हा परिषदेचा उपक्रम : महाराष्ट्र शासनाचे राष्ट्रीय स्वच्छता अभियान

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा मुख्यालयासह जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती व ४३२ ग्रामपंचायत क्षेत्रात एकाचवेळी स्वच्छतेचा उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनअंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली परिसर स्वच्छतेचा कार्यक्रम घेण्यात आला.महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छता अभियान २०१५ अन्वये या स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन जिल्ह्यात एकाचवेळी करण्यात आले होते. या उपक्रमात सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल रेडकर, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकांत रणदिवे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा कृषी विकास अधिकारी एस. एन. म्हेत्रे, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील काळे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन देशमुख या सर्व खातेप्रमुखांसह जिल्हा परिषदमधील सर्व अधिकारी व कर्मचारी या उपक्रमात सहभागी झाले होते.हा कार्यक्रम जिल्हा परिषदअंतर्गत गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येत असून यावर्षीसुद्धा यशस्वीपणे स्वच्छतेचा कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान अनेक ग्रामपंचायतीमध्ये प्रभातफेरी, पथनाट्य, समूहगान, प्रचारफेरी काढण्यात आल्या व स्वच्छतेचे संदेश देण्यात आले. संपूर्ण जिल्ह्यात एकाचवेळी हा उपक्रम राबविण्यात आला असून तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे : सावंतवाडी पंचायत समिती कार्यालय व ७४ ग्रामपंचायती क्षेत्रात परिसर स्वच्छता कार्यक्रम घेण्यात आला. दोडामार्ग पंचायत समिती कार्यालय व एकूण ३६ ग्रामपंचायती क्षेत्रात परिसर स्वच्छता कार्यक्रम घेण्यात आला. मालवण पंचायत समिती कार्यालय व ६९ ग्रामपंचायती क्षेत्रात परिसर स्वच्छता कार्यक्रम घेण्यात आला. देवगड पंचायत समिती कार्यालय व ७४ ग्रामपंचायती क्षेत्रात परिसर स्वच्छता कार्यक्रम घेण्यात आला. वैभववाडी पंचायत समिती कार्यालय व ३४ ग्रामपंचायती क्षेत्रात परिसर स्वच्छता कार्यक्रम घेण्यात आला. वेंगुर्ला पंचायत समिती कार्यक्षेत्रातील सर्व ३० ग्रामपंचायती क्षेत्रात परिसर स्वच्छता कार्यक्रम घेण्यात आला. एवढ्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात स्वच्छता मोहीम राबविण्याची पहिलीच वेळ आहे. (प्रतिनिधी)