शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

बंद प्रकल्पामुळे कोट्यवधींचा चुराडा

By admin | Updated: June 7, 2014 00:29 IST

टाळंबाची व्यथा : कार्यालये, वसाहतींची दुरवस्था, कर्मचाऱ्यांना बिनकामी पगार

विजय पालकर ल्ल माणगावसात गावांचे पुनर्वसन करुन पासष्ट गावांना ओलिताखाली आणण्याच्या उद्देशाने पस्तीस वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करुन सुरु करण्यात आलेल्या टाळंबा प्रकल्पाच्या कार्यालयांची व वसाहतींची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रकल्पातील कर्मचाऱ्यांसह कार्यालयांचे व वसाहतींचे पुनर्वसन करण्याची वेळ आली आहे. गेले दीड वर्ष बंदावस्थेत असल्याने जनतेच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्याचाच हा प्रकार आहे. तसेच बिनकामी पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना काम सुरु असलेल्या ठिकाणी पाठविण्याकडेही वरिष्ठांनी दुर्लक्ष केले आहे.माणगाव खोरे पाण्याने समृद्ध करण्यासाठी पस्तीस वर्षापूवी कोकण पाटबंधारे विकास महामंडळाने टाळंबा प्रकल्प सुरु केला. या प्रकल्पाच्या माध्यमातून माणगाव परिसरातील बुडीताखाली येणाऱ्या सात गावांचे पुनर्वसन करण्याचा बेत आखून परिसरातील पासष्ट गावांना मुबलक पाणीसाठा करण्याचा मुख्य उद्देश या प्रकल्पातून साधण्यात येणार होता. मात्र, सद्यस्थिती पाहता या प्रकल्पामुळे शासनाचा म्हणजे जनतेचाच कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्यात आल्याचे दिसून येत आहे. या प्रकल्पामुळे बुडीत क्षेत्रात येणाऱ्या वसोली, उपवडे, साकीर्डे, आंजिवडे, चाफेली, हळदीचे नेरुर, पुळास या सात गावांच्या पुनर्वसनाबाबतही कोणतीही भूमिका घेण्यात आलेली नाही. तसेच या प्रकल्पामुळे गेल्या तीस वर्षात पाण्याचा एक थेंबही साठविण्यात आलेला नाही.या टाळंबा प्रकल्पासाठी त्यावेळी कार्यालये उभारण्यात आली. लाखो रुपये खर्च करुन गोडावून बांधण्यात आली. मात्र, आजपर्यंत या गोडावूनमध्ये एकही सिमेंटचे पोते उतरविण्यात आलेले नाही. त्यामुळे ही गोडावून का बांधण्यात आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कार्यालयांची व कर्मचारी वसाहतींची अवस्थाही आता स्मशानभूमीसमान झाली आहे. कित्येकवर्षे या कार्यालयांच्या व वसाहतींच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष देण्यात आलेले नाही. त्यामुळे दीड वर्षे बंदावस्थेत असणारा हा प्रकल्प पुन्हा सुरु होणार का? याबाबतही प्रश्नचिन्ह आहे.जवळपास दीड वर्षे टाळंबा प्रकल्पाचे काम बंद आहे. या दीड वर्षाच्या कालावधीत कर्मचाऱ्यांनी शासनाचे केलेले काम आणि त्यांनी पगारापोटी घेतलेला मोबदला याचे समीकरण मांडले तर या प्रकल्पातील छोटे घोटाळे एकत्र केल्यास मोठा घोटाळा निर्माण होऊ शकतो. टाळंबा प्रकल्पातील काही कर्मचारी असेही आहेत ज्यांना काम न करता पगार घेणं कमीपणाचे वाटत आहे. परंतु, त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच आहे. कोकण पाटबंधारे 'विकास' महामंडळ किती भकास असू शकते हे या टाळंबा प्रकल्पाच्या ठिकाणी आल्यास नक्की कळते.