शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सावंतवाडी मतदारसंघावर दावा

By admin | Updated: July 16, 2014 00:26 IST

अतुल काळसेकर : भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत मागणी करणार

कणकवली : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची पक्ष संघटना सरस आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ भाजपाला मिळावा अशी मागणी पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी दिली.येथील संपर्क कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काळसेकर म्हणाले, १६ जुलै रोजी सकाळी १० वाजता मुंबई येथील वसंत स्मृती सभागृहात प्रदेश भाजपा कोअर टीम व सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाच्या कोअर टीमची एकत्रित बैठक होणार आहे. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्षनेते विनोद तावडे, आमदार पंकजा मुंडे, सुधीर मनगुंटीवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. यावेळी माझ्यासह जिल्ह्याच्या कोअर कमिटीचे सदस्य आमदार प्रमोद जठार, प्रमोद रावराणे, जयदेव कदम, चारुदत्त देसाई, राजन म्हापसेकर, राजू राऊळ, राजश्री धुमाळे, अ‍ॅड. अजित गोगटे, मिलिंद केळुसकर उपस्थित राहून भाजपा नेत्यांशी चर्चा करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या तयारीबाबत माहिती देण्यात येणार आहे.सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी गेली साडेतीन वर्षे भाजपाकडून करण्यात येत आहे. त्याची माहितीही या आढावा बैठकीत देण्यात येणार आहे. बदललेल्या राजकीय समीकरणात राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी शिवसेना प्रवेशाचे संकेत दिले आहेत. तसेच एक कार्यकर्ता म्हणून संघटनेत आपण काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्याबद्दल त्यांचे स्वागत करतो. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी निवडणूक लढविलेले शिवराम दळवी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे तर शिवसेनेच्या तत्कालीन दोन जिल्हाप्रमुखांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. गेली साडेतीन वर्षे शिवसेनेत अस्थिर स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी भाजपाने या मतदारसंघात टेकीने काम सुरु केले होते. बुथ एजंट नेमण्याबरोबरच संघटना बांधणीही करण्यात आली आहे. दोडामार्ग पंचायत समिती भाजपाकडे असून सभापतीही भाजपाचेच आहेत. बांदा पंचायत समिती मतदारसंघाबरोबरच सरपंचही आमचाच आहे. आजूबाजूच्या ग्रामपंचायतींही भाजपाच्याच ताब्यात असून वेंगुर्ले नगरपरिषदेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा आमचा पक्ष आहे. त्यामुळे या मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवाराने निवडणूक लढवावी अशी भावना कार्यकर्त्यांची आहे. या मतदारसंघातील पक्ष संघटनेच्या अस्तित्वाचा प्रश्न या निवडणुकीच्या माध्यमातून निर्माण झाला आहे.केसरकर हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने स्थानिक शिवसैनिक नाराज आहेत. याठिकाणी पक्षातीलच स्थानिक उमेदवार द्यावा, अशी मागणी होत आहे. त्यामुळे या नाराजीचाही फटका विधानसभा निवडणुकीत बसू शकतो याकडे पक्षश्रेष्ठींचे लक्ष वेधणार असल्याचे काळसेकर म्हणाले. (वार्ताहर)