शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षाचा अट्टाहास युतीच्या अंगलट

By admin | Updated: November 25, 2015 00:35 IST

अपमान नाट्याचा फायदा उठवला काँग्रेसने : मैत्रीपूर्ण राजकारणाच्या नव्या वाटचालीस सुरूवात

वैभव साळकर -- दोडामार्ग  -पुरेसे संख्याबळ नसतानासुद्धा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने कसई दोडामार्ग नगरपंचायतीची सत्ता काबीज करून युतीच्या तोंडचा घास हिरावून घेतला. सुरूवातीपासूनच एकत्र लढलेल्या सेना-भाजपचा नगराध्यक्ष पदासाठीचा अट्टाहास, त्यातून निर्माण झालेली नाराजी आणि अपमाननाट्य याचा काँग्रेस-राष्ट्रवादीने पुरेपूर फायदा उठवत सत्ता स्थापन केली. एकेकाळचे काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे दावेदार संतोष नानचे यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे संध्या प्रसादी, रेश्मा कोरगावकर आणि रामचंद्र ठाकूर यांनी एकत्र येत काँग्रेसला सहकार्य केल्याने सत्ता समीकरण ठरविण्यात आघाडीला यश आले. त्यामुळे या निवडणुकीत राजकारणात कोण कोणाचा दीर्घकालीन शत्रू आणि मित्रही नसतो, याचा प्रत्यय शहरवासीयांना आला. कसई दोडामार्ग नगरपंचायत निवडणूक तशी सुरूवातीपासूनच गाजली आणि चर्चेतही राहिली. एकेकाळचे काँगे्रसचेच असलेल्या संध्या राजेश प्रसादी, रेश्मा कोरगावकर आणि राजेश प्रसादी यांनी काँग्रेसपासून फारकत घेत दोन वर्षांपूर्वीच सेना-भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर रामचंद्र ठाकूर यांनी मनसेत प्रवेश केला. त्यापैकी संध्या प्रसादी यांनी या नगरपंचायतीच्या निवडणुकीत सेनेच्या, तर त्यांचे पती आणि माजी सरपंच राजेश प्रसादी हे भाजपमधून निवडणूक लढले. तर रेश्मा कोरगावकर यासुद्धा भाजपमधूनच नगरपंचायतीच्या निवडणुकीला सामोरे गेल्या. तर रामचंद्र ठाकूर हे मनसेमधून नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यापैकी राजेश प्रसादी हे संतोष नानचे यांच्या विरूद्ध निवडणुकीतच उभे होते. नानचे विरुद्ध प्रसादी अशी लक्षवेधी लढत प्रभाग क्र. ४ मध्ये गाजली. त्यामुळे प्रसादी व नानचे एकत्र येतील, याबाबत शंकाच होती. परंतु राजकारणात कोणी कोणाचा जास्त काळ शत्रू आणि मित्रही नसतो, असे म्हणतात त्याचाच प्रत्यय या निवडणुकीत तंतोतंत आला. कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या इतिहासात झालेल्या पहिल्याच निवडणुकीतील हा किस्सा त्यासाठीच कायम स्मरणात राहील. शिवाय भविष्यातील मैत्रीपूर्ण राजकारणाची सुरूवातही करील. भाजपच्या नगरसेवक तथा माजी जिल्हा परिषद सदस्या रेश्मा कोरगावकर यादेखील नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत होत्या. मात्र, ऐनवेळी त्यांचाही पत्ता कट करून भाजपने सुधीर पनवेलकर यांचे नाव पुढे केले होते. त्यामुळे त्यादेखील नाराज होत्या. तर मनसेचे रामचंद्र ठाकूर हे सेना-भाजप युती सरकारवर पहिल्यापासूनच नाराज होते. त्यामुळे त्यांचा कौल आपूसकच काँग्रेसच्या बाजूने झुकला होता. नेमकी हीच वेळ साधत व नेमका याचाच फायदा काँगे्रेस-राष्ट्रवादीला झाला. संध्या प्रसादी, रेश्मा कोरगाकर व ठाकूर यांनी काँगे्रसला अर्थात नानचे यांना पाठिंबा दिला आणि नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांची निवड झाली. मात्र, या निवडणुकीत राजकारणात कोण कोणाचा दीर्घकाळ शत्रू आणि मित्रही नसतो, याचा प्रत्यय कसई दोडामार्ग शहरवासीयांसह जिल्ह्यातील जनतेला किंबहुना राजकीय पदाधिकाऱ्यांनाही यानिमित्ताने आला असेल हे मात्र नक्की. या विजयाने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असून जिल्ह्यात सर्वत्र फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.मध्यस्थी असफल : प्रसादींची नाराजी भोवलीभाजप आणि सेनेचे संख्याबळ १० असताना सुद्धा सेना-भाजप या दोन्ही मित्रपक्षांनी नगराध्यक्षपदाचा अट्टाहास धरला. या अट्टाहासामुळेच सेनेकडून संध्या राजेश प्रसादी, तर भाजपकडून सुधीर पनवेलकर यांनी उमेदवारी अर्ज नगराध्यक्षपदासाठी दाखल केले. दोन्ही पक्षांची नेतेमंडळी नगराध्यक्ष आपलाच हवा, यासाठी अडून बसली. ही युती तुटते की काय, अशी शक्यता निर्माण झाली. त्यामुळे खुद्द पालकमंत्री दीपक केसरकर यांनीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो प्रयत्नदेखील असफल ठरला. मात्र, अचानक नाट्यमयरित्या सेनेने बॅकफूटवर येत प्रसादी यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले. परिणामी प्रसादी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला खरा; पण त्यांच्या चेहऱ्यावर नाराजीचा भाव स्पष्ट जाणवत होता. याच नाराजी आणि अपमाननाट्याचा फायदा काँग्रेसने करून घेतला. या नाराजीवर मात्र भाजपने तटस्थ राहत केवळ बघ्याची भूमिका घेतली. प्रसादी यांचा झालेला अपमान हा भाजपच्या कुणीच पदाधिकाऱ्यांनी मनावर घेतला नाही की त्यांच्याबाबत सकारात्मक निर्णयही घेतला नाही.नगराध्यक्षपदासाठी सेनेने माझा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. जर हा अर्ज मागे घ्यायचाच होता, तर मुळात तो भरणे चुकीचे होते. मात्र, मुद्दाम अर्ज भरायला लावून तो शेवटच्याक्षणी मागे घेण्यास मला भाग पाडले. त्यामुळे माझ्यावर अन्याय झाल्याने मी संतोष नानचे यांना पाठिंबा दिला. - संध्या प्रसादी, नगरसेवक, शिवसेनानगराध्यक्षपदी मीदेखील इच्छुक होते. मात्र, ऐनवेळी मझा पत्ता कट करून सुधीर पनवेलकर यांना संधी देण्यात आली. यापूर्वीदेखील दोनवेळा माझ्यावर अन्याय झाला. त्यामुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांवर झालेल्या अन्यायाविरूद्धच मी काँग्रेसला पाठिंंबा देत मतदान केले.- रेश्मा कोरगावकर, नगरसेवक, भाजपसेना-भाजप युती सरकारला लोकांच्या अपेक्षा पूर्ण करता आलेल्या नाहीत. पालकमंत्री दीपक केसरकर जिल्ह्यातील लोकांचे प्रश्न सोडवू शकलेले नाहीत. त्यामुळे केसरकरांच्या अकार्यक्षम कारभारामुळेच कसई दोडामार्गमध्ये स्थिर सरकार देण्याकरिता काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा देण्यात आला. - रामचंद्र ठाकूर, नगरसेवक, मनसे