शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

वेंगुर्ले शहर स्वच्छ, सुंदर करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2015 00:48 IST

ज्येष्ठ नागरिकांचा निर्धार : संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा

वेंगुर्ले : येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्याची संकल्पना मांडून यासाठी सर्वातोपरी मदत करण्याचा निर्धार ज्येष्ठ नागरिकांनी केला.संघाचे अध्यक्ष रा. पां. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली साई मंगल कार्यालयात मंगळवारी (दि. ९) सभा पार पडली. यावेळी न. प. चे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी सभेपुढे स्वच्छ व सुंदर वेंगुर्लेची संकल्पना मांडली. सभेच्या सुरुवातीला संघाचे सर्व दिवंगत सदस्य तसेच नेपाळच्या भूकंपात दगावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यवाह रघुनाथ परब यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून सभेपुढील कामांची माहिती दिली. उपाध्यक्ष शामराव काळे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले. संघाच्या २०१४-१५ च्या अहवाल जमाखर्चाला तसेच २०१५-१६ च्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. का. हु. शेखा यांची अंतर्गत हिशेब तपासणीस म्हणून फेरनिवड करण्यात आली. माधवबाग येथील साने केअर सेंटरच्यावतीने डॉ. पल्लवी पाटील यांनी ज्येष्ठांसाठी हृदयरोगाची कारणे व उपाय यावर मागदर्शन केले. प्रोजेक्टरच्या माध्यमातून हृदयात व रक्तवाहिनीत उत्पन्न होणारे अडथळे यांचे सचित्र वर्णन करून उपचार पद्धतीची परिपूर्ण माहिती दिली. तसेच आहार व व्यायाम यावर ज्येष्ठांनी जास्त भर द्यावा, असे सांगितले व भविष्यात ज्येष्ठांसाठी मोफत तपासणी शिबिर घेण्याचे आश्वासन दिले. अध्यक्ष रा. पां. जोशी यांनी साई मंगल कार्यालयाचे अंबरीश मांजरेकर, डॉ. पल्लवी पाटील व सहकारी व सर्व देणगीदारांचे आभार मानले. (प्रतिनिधी)