शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या घटनांमुळे नागरिक भयभीत

By admin | Updated: June 21, 2017 00:26 IST

तपासात पोलिसांना अपयश : सीसीटीव्ही कॅमेरे बंद; चोरट्यांचे फावले

लोकमत न्यूज नेटवर्क कणकवली : तालुक्यातील साकेडी-फौजदारवाडी येथील घर फोडून झालेली चोरी व कणकवली शहरातील नरडवे नाका येथे महिलेच्या अंगावरील तीन तोळ्याची सोन्याची माळ चोरल्याबाबत कणकवली पोलिसांच्या हाती अजून काहीही सुगावा लागलेला नाही. शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे चोरट्यांचे चांगलेच फावले आहे. साकेडी येथील मारुती राणे यांच्या घरातील १ लाख ९0 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची घटना सोमवारी सकाळी १0.३0 ते दुपारी १२.३0 च्या दरम्यान घडली होती. तर कणकवली शहरातील नरडवे नाका येथे बिजलीनगर येथील वंदना दिनकर मुसळे या महिलेला पोलीस असल्याचे भासवून तिच्या गळ्यातील ३ तोळ्याची माळ चोरट्यांनी लंपास केली होती. हा चोरीचा प्रकार सोमवारी सायंकाळी ६.३0 च्या दरम्यान घडला होता. शनिवार १७ जून रोजी रात्री हर्ष कॅफे फोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला होता. या तिन्ही चोरींप्रकरणी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेत आहेत. सोमवार १९ जून रोजी सकाळी दिवसाढवळ्या साकेडी येथील घर फोडून सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले होते. एकापाठोपाठ एक चोरीच्या घटना घडू लागल्यामुळे नागरिकांनी भीती व्यक्त केली आहे. पोलीस असल्याचे सांगून महिलांच्या गळ्यातील दागिने कागदात बांधून ती पुडी महिलेला देण्यात येते. या घटना वारंवार घडत असताना महिलांमध्ये जनजागृती होत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलीस निरीक्षकांचे आश्वासन आमदार नीतेश राणे यांनी एक वर्षापूर्वी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. त्यामुळे शहरातील असे भुरटे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होत होते. आता मात्र सीसीटीव्ही कॅमेरेच बंद असल्यामुळे चोरट्यांचे पुन्हा फावले आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मुदत एक वर्ष असल्यामुळे मुदतीपर्यंत ते चालले. मात्र आता पुन्हा त्यांची मुदत वाढवून घेणे आवश्यक आहे. या बाबतीत लक्ष घालण्यात येईल व सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू करण्यात येतील, असे पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.