शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विकास आराखड्यावरून नागरिक आक्रमक

By admin | Updated: September 6, 2015 20:58 IST

ंमालवणमध्ये नगरसेवकांना घेरले : मेढा मौनिनाथ मंदिरात बैठक

मालवण : शहरात प्रस्तावित विकास आराखड्यावरून नागरिकांची विरोधाची धार तीव्र होत आहे. प्रभागनिहाय बैठका घेऊन विकास आराखड्याला विरोध होत आहे. निवडणुकीनंतर चार वर्षांनी एकत्र येणाऱ्या सर्व नगरसेवकांना नागरिकांनी घेरले. खड्डेमय रस्ते, स्ट्रीट लाईट, कचरा, अर्धवट भुयारी गटार योजना या समस्यांचा पाढा वाचत नगरसेवकांना लक्ष्य केले. दरम्यान, शहर विकास आराखड्यातील वाढीव रस्ता रुंदीकरण व प्रस्तावित आरक्षणे यावर सामूहिक तसेच वैयक्तिक हरकती नोंदविण्यावर एकमत झाले.येथील मेढा मौनिनाथ मंदिर येथे शहर विकास आराखड्याला विरोध दर्शविण्यासाठी रविवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी नगरसेवक महेश जावकर, महेंद्र म्हाडगुत, महानंदा खानोलकर, ममता वराडकर, गणेश कुशे तसेच मेढा, राजकोट भागातील नागरिक उपस्थित होते. महेश जावकर यांनी विकास आराखडा प्रसिद्ध होण्यापूर्वी नगरपरिषदेत घेण्यात आलेल्या ठरावाचे वाचन करीत प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाची माहिती देण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांची लांबलेली माहिती गणेश कुशे यांनी थांबवत आम्ही तुमचे कीर्तन ऐकायला आलो नाही, नगरसेवकांनी कोणतीही स्पष्ट भूमिका न मांडल्यानेच हा आराखडा जनतेच्या मुळावर उठला आहे, असे सांगितले. काही नागरिकांनी नगरसेवकांना आमच्या मागण्या पूर्ण करणे शक्य नाही झाले तर जागा दाखवून देऊ, अशी भूमिका घेतली. नगरसेवकांना घेरले बैठकीत नागरिकांनी आपल्या समस्यांचा पाढा वाचला. चार वर्षांनंतर सगळे नगरसेवक एकत्र आले आहेत. निवडणुकीच्यावेळी मते मागितल्यानंतर हे एकत्र दिसत आहेत. शहरातील रस्ते, स्ट्रीट लाईट, कचरा, डास फवारणी या समस्या नगरसेवकांना का दिसत नाहीत? असे सांगत महिला नगरसेवकांनाही धारेवर धरले. ग्रामीण रुग्णालयाकडे लक्ष द्यातुमचा विकास आराखडा बाजूला ठेवा. अगोदर ग्रामीण रुग्णालयात ज्या समस्या आहेत, त्या दूर करा, असे बैठकीदरम्यान एका ज्येष्ठ नागरिकाने सांगितले. यावर नागरिकांनीही पाठिंबा देत शहर विकास आराखड्यास एकत्र येऊन हरकती नोंदवूच, पण त्याबरोबर शहरातील समस्या दूर करण्यासाठी लक्ष देणे गरजेचे आहे, असे सांगण्यात आले.