शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
5
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
6
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
7
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
8
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
9
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
10
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
11
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
12
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
13
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
14
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
15
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
16
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
17
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
18
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा युवा नेता निघाला काँग्रेसचा आमदार, वाद होताच दिला पदाचा राजीनामा
19
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
20
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार

सिने नाट्य कलावंत जनार्दन परब यांचे निधन

By admin | Updated: April 3, 2016 03:50 IST

हृदयविकाराचा धक्का : नाट्यक्षेत्रात हळहळ व्यक्त

कणकवली : जेष्ठ सिने नाट्य कलाकार जनार्दन परब (वय ६८) यांचे शनिवारी सकाळी आठ वाजता मुंबई येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. सिंधुदुर्गमधील हरकुळ खुर्द हे मूळ गाव असलेल्या जनार्दन परब यांनी मराठी रंगभूमी, चित्रपट, तसेच हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. लहानपणापासूनच जनार्दन परब यांना अभिनय कलेची आवड आणि जाण होती. संपूर्ण बालपण कोकणात तर महाविद्यालयीन शिक्षण आणि नोकरीसाठी ते मुंबईत दाखल झाले. तरुण वयातच ते एकांकीका आणि प्रायोगिक नाटकांशी जोडले गेले. नोकरी व शिक्षण सांभाळत आपल्या अभिनयाची हौस आणि आवड अगदी मनापासून जोपासली. विजया मेहतासारख्या नट मंडळींचे मार्गदर्शन याच काळात त्यांना लाभले. त्यांच्या प्रमुख नाटकांमध्ये ‘अवध्य’, ‘नकटीच्या लग्नाला’, ‘अजब न्याय वर्तुळाचा’, ‘हमिदाबाईची कोठी’, ‘रात्र थोडी सोंग फार’, ‘काका किशाचा’, ‘संगीत विद्याहरण’, ‘मुद्राराक्षस’ तर ‘धुमशान’, ‘नशिबवान खावचो घोव’, ‘कबूतरखाना’सारख्या मालवणी नाटकांमध्ये अभिनयासोबतच काही नाटकांची दिग्दर्शनाची देखील धुरा सांभाळली. अनेक हिंदी-मराठी चित्रपटातील भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. यामध्ये ‘माझा पती करोडपती’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘गम्मत जम्मत’, ‘कुलस्वामिनी तुळजाभवानी’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, हिंदीत ‘कसम’, ‘शिकारी’, ‘ऐलान’, ‘जिद्दी’, ‘क्रांतीवीर’, ‘बाजीगर’, ‘नायक’, ‘गुलाम’, ‘उडान’, ‘चायना गेट’सारख्या चित्रपटांचा उल्लेख करता येईल. क्रांतिवीर चित्रपटातील त्यांचा आणि नाना पाटेकर यांचा प्रसंग आजही स्मरणात आहे. काही वर्षापूर्वी शारीरिक अस्वास्थ्यामुळे जनार्दन परब यांनी कला क्षेत्रापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. पण दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी पुन:श्च या क्षेत्रात परतण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अनेक मालिका आणि चित्रपटांमधून भूमिकेच्या माध्यमातून ते आपल्याला दिसत राहिले. मालवणी रंगभूमीला त्यांनी दिलेलं योगदान वाखाणण्याजोगं आहे. नवीन विषय प्रेक्षकांसमोर मांडत, परब यांनी तरुण कलाकारांसोबत मालवणी रंगभूमी पुनर्जिवीत ठेवण्याचं कार्य केलेलं आहे. अनेक चित्रपटांमधून तसंच दूरचित्रवाणी मालिकांमधून चरित्र अभिनेता म्हणून त्यांचं काम दखल घेण्याजोगे आहे. जनार्दन परब यांनी चार दशकाहून अधिक काळ रंगभूमी व रुपेरी पडद्यासाठी स्वत:ला झोकून दिले. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना ‘शंकर घाणेकर पुरस्कार’, २००८ सालचा ‘नटवर्य केशवराव दाते पुरस्कार’ तसेच ‘कॉलेज साहित्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांच्या निधनाने नाट्य क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून आणि दोन नातू असा परिवार आहे. (प्रतिनिधी)