शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

चौैघांची नावे चर्चेत; दोघांमध्ये चुरस

By admin | Updated: November 15, 2015 00:38 IST

देवरूख : भाजप तालुकाध्यक्ष निवड

देवरुख : संगमेश्वर तालुक्यात भाजप तालुकाध्यक्ष बदलाच्या हालचाली वेगात सुरु असून, संतोष केदारी, अमित केतकर, जाकीर शेकासन आणि दीपक जाधव यांची नावे या पदासाठी चर्चेत आहेत. मात्र, यामध्ये संतोष केदारी आणि अमित केतकर यांच्यामध्येच मुख्य चुरस आहे. केंद्रात आणि राज्यात एकहाती सत्ता असूनही तालुक्यात भाजपच्या वाढीसाठी म्हणावे तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. येत्या काही दिवसात संगमेश्वर तालुका भाजपचा अध्यक्ष बदलण्याच्या हालचाली पक्षपातळीवर सुरु आहेत. नव्या अध्यक्षांचा शोध सुरु झाला असून, या पदासाठी देवरुख येथील युवा कार्यकर्ते संतोष केदारी, साखरपा येथील युवा कार्यकर्ते अमित केतकर, माजी पंचायत समिती सदस्य जाकीर शेकासन, माजी जि. प सदस्य दीपक जाधव यांच्या नावांची चर्चा आहे. संगमेश्वर तालुका भाजपच्या अध्यक्षपदी संगमेश्वर माभळेचे उपसरपंच दिलीप गीते कार्यरत आहेत. विधानसभा निवडणुकीआधीच माजी आमदार बाळ माने यांच्या कृपेने त्यांची अध्यक्षपदावर वर्णी लागली होती. सुरुवातीपासूनच शिवसेनेत कार्यरत असलेले गीते २००६नंतर तत्कालीन आमदार सुभाष बने यांच्यासोबत काँग्रेसमध्ये गेले. यानंतर त्यांनी माभळेचे उपसरपंचपद भूषविले. चार वर्षापूर्वी झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत त्यांना नावडी गटातून काँग्रेसकडून पंचायत समितीची उमेदवारी हवी होती. मात्र, ती जागा राष्ट्रवादीकडे गेल्याने त्यांनी बंडखोरी करत ती निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. त्यामध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्या निवडणुकीत त्यांनी मिळवलेली लक्षणीय मते पाहून बाळ माने यांनी त्यांना भाजप प्रवेशाचे निमंत्रण दिले. पक्षप्रवेशावेळीच पदाची मागणी केलेल्या गीतेंची इच्छा पूर्ण करण्यात आली. मात्र, त्यानंतर तालुक्यात पक्ष ज्या पद्धतीने वाढला पाहिजे होता, तसा वाढल्याचे दिसत नाही. तालुक्यात पक्ष वाढीसाठी प्रयत्नही होताना दिसत नाही. सातत्याने संपर्कात असणाऱ्याकडेच या पदाची धुरा सोपवली जावू शकते. आता यापैकी कोण बाजी मारतो याकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)