शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चिपी विमानतळाची मोजणी रोखली

By admin | Updated: December 16, 2014 00:13 IST

प्रक्रिया चुकीची : प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा आरोप

कुडाळ : परूळे चिपी येथील विमानतळासाठी संपादित करण्यात आलेल्या जागेची मोजणी करण्यासाठी आलेल्या एमआयडीसी रत्नागिरीच्या व वेंगुर्ले भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी रोखले. यामुळे जागेची मोजणी होऊ शकली नाही. प्रकल्पग्रस्तांनी मात्र ही मोजणीची प्रक्रिया चुकीची असल्याचे सांगितले. विमानतळासाठी संपादित करण्यात आलेल्या जागेची मोजणी डिसेंबर २०१४ मध्ये करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने एमआयडीसी रत्नागिरी व वेंगुर्ले भूमी अभिलेखच्या उपअधीक्षकांनादिले होते. या आदेशानुसार संबंधित विभागांकडून मोजणीचे काम सुरू करण्यात आले होते. या मोजणीसाठी १५ डिसेंबर रोजी सर्व अधिकारी चिपी विमानतळ आले होेते. मात्र, त्याआधीच प्रकल्पग्रस्त शेतकरी व भूमी बचाव समितीचे सभासद शेकडोच्या संख्येने उपस्थित होते. या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी चुकीच्या पध्दतीने करण्यात येणाऱ्या मोजणी प्रकिे्र येला विरोध दर्शवित मोजणी थांबविली. यावेळी समिती अध्यक्ष चंद्रवर्धन आळवे, हनुमंत राठिवडेकर, चिपी सरपंच प्रकाश चव्हाण, परूळे सरपंच प्रदीप प्रभू आदी सहभागी होते. जमीन मोजणी संबंधात संबंधित विभागाने सीमेलगतच्या खातेदारांना नोटिसा बजाविल्या होत्या. परंतु शेतकरी भूमी बचाव समितीशी कोणताच पत्र व्यवहार केला नव्हता. या संदर्भात कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरताच माफी मागितली.यावेळी समितीच्यावतीने या संदर्भात उपस्थित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात ही जमीन मोजणी प्रक्रिया चुकीची असून जनतेची दिशाभूल करणारी असल्याचे स्पष्ट केले आहे. (वार्ताहर)