शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘सेक्रेड हार्ट स्कूल’मध्ये चिमुकल्यांचे बॅण्डपथक

By admin | Updated: January 9, 2016 00:33 IST

अनोखा उपक्रम : चिमुकल्यांच्या बॅण्डवर सारेच थिरकले!

मेहरून नाकाडे -- रत्नागिरी  पांढऱ्या रंगाच्या पोशाखावर घालण्यात आलेला आकर्षक लाल रंगाचा कोट, डोक्यावर पांढरी लाल तुरेवाली टोपी आणि शाळेच्या प्रांगणात गुंजणारे मधूर सूर, मोठ्यानाही लाजवेल, असे सुमधूर संचलन, त्याला मिळालेली कौतुकाची थाप हे सारे वातावरण अनुभवायला मिळाले ते रत्नागिरी शहरातील सेक्रेड हार्ट कॉन्व्हेट स्कूल, उद्यमनगरमध्ये! या चिमुकल्यांनी बॅण्ड पथकावर सादर केलेली देशभक्तीपर गीते, प्रार्थना साऱ्यांच्याच कौतुकास पात्र ठरली.शालेय शिक्षणाबरोबर एक धाडसी पाऊल उचलून शाळेने तयार केलेल्या ‘स्कूल बँड’चे उद्घाटन जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी. यांच्या हस्ते करण्यात आले. बँड पथकाने जिल्हाधिकारी व मान्यवरांचे स्वागत केले. सलग ४५ मिनिटे विद्यार्थ्यांनी संचलन केले.जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी. यांनी शाळेचा नवोपक्रम व संकल्पनेस कारणीभूत असलेले शाळेचे शिस्तबध्द व्यवस्थापन, शालेय नियमित कामकाज, सदैव तत्पर असलेला शाळेचा शिक्षकवर्ग व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. मुख्याध्यापिका सिस्टर आयरीन, व्यवस्थापिका सिस्टर डायनोसिया, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सिस्टर रेमेथिन व कर्मचारीवर्गाचे अभिनंदन करून नवीन संकल्पना व उपक्रम निर्मितीबद्दल शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे औचित्य साधून शिक्षक - पालक संघाचे सदस्य डॉ. संजय कुलकर्णी यांचा जगातील हुशार मंडळींमध्ये सहभाग झाल्याबद्दल तसेच राज्यस्तरीय शालेय गोळाफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेती साक्षी कनगुटकर, राज्यस्तरीय तायक्वाँदो स्पर्धेत सुवर्णपदक विजेती सिध्दी तांजे यांना शाळेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. (प्रतिनिधी)शाळेचे बॅण्डपथक तयार करण्यासाठी मुख्याध्यापिका सिस्टर आयरीन गेली दोन वर्षे विचाराधीन होत्या. यावर्षी त्यांनी पालकांसमोर हा प्रस्ताव ठेवला. संमती मिळाल्यानंतर त्यांनी बॅण्डपथकाचे सर्व साहित्य काही खरेदी केले. त्यानंतर त्यांनी प्रशिक्षक मि. राजीव, मि. जॉन्सन्, मि. जोस यांना पाचारण केले. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी बॅण्डपथकाचे प्रशिक्षण सुरू होईल. गेला दीड महिना न चुकता सराव सुरू होता. विद्यार्थ्यांचाही त्यास भरभरून प्रतिसाद लाभला. विद्यार्थी-विद्यार्थिनींना बॅण्ड वाजवण्याबरोबर बॅण्डच्या तालावरील संचलन शिकविण्यात आले. हा अनोखा उपक्रम या शाळेत राबवण्यात आला आहे.या बॅण्ड पथकामध्ये ५० विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाल्या आहेत. सततच्या सरावामुळे बॅण्डवर राष्ट्रगीत, वंदे मातरम, विविध प्रार्थना, इंग्रजी गाणी विद्यार्थी सुंदर सादर करतात. सलग ४५ मिनिटे विद्यार्थी बॅण्डच्या तालावर सुंदर संचलन सादर करीत आहेत. प्रशिक्षकांनी केलेल्या मेहनतीने हे बॅण्डपथक तयार झाले आहे.