शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
3
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
4
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
5
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
6
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
7
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
8
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
9
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
10
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
11
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
12
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
13
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
14
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
15
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
16
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
17
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
18
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
19
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
20
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...

मिरचीची धुमी घालून हत्तीला पळविले

By admin | Updated: June 11, 2014 00:35 IST

नानेली- सुतारवाडी येथील घटना

माणगाव : घराच्या पडवीत ठेवलेल्या रेशन दुकानावरील तांदळाच्या बारदानाचा वास आल्याने पडवीची खिडकी उचकटून घराभोवती सुमारे अर्धा तास धिंगाणा घालणाऱ्या हत्तीला अखेर घरमालकाने घराच्या मागच्या बाजूस मिरचीची धुमी घालून पळविले. मात्र, या अर्ध्या तासाच्या थरार नाट्यात सावंत कुटुंबियांनी प्रत्यक्ष यमराजच घराभोवती फेऱ्या मारीत असल्याचा अनुभव घेतला. सोमवारी रात्री २.३० वाजण्याच्या सुमारास नानेली- सुतारवाडी येथील सुमन मुकुंद सावंत यांच्या घराकडे हत्तीचे आगमन झाले. समोरच्या बंदिस्त पडवीत घरगुती वापरासाठी रेशन दुकानवरील रिकामी तांदळाची चार बारदाने आणून ठेवली होती. त्यांचा वास आल्याने या टस्कराने पडवीची खिडकीच उचकटून काढली. कसला तरी आवाज आल्याचे सावंत यांच्या लक्षात येताच त्यांनी दार उघडून अंदाज घेतला असता, हत्ती पडवीच्या खिडकीतील बारदाने सोंडेने बाहेर घेत असल्याचे दिसले. त्यांनी लगेच घरातील इतरांना याची कल्पना दिली. परंतु हत्ती काही केल्या तेथून हालेना. अखेर प्रसंगावधान राखून सावंत यांनी काही दिवसांपूर्वीच एका मार्गदर्शन शिबिरादरम्यान हत्तींना पळवून लावण्याविषयी डॉ. रुद्र यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या घराच्या मागील बाजूस मिरचीची धुनी पेटविली. यामुळे हत्तीने लगेचच तेथून पळ काढला. परंतु हत्तीने इतर कसलेही नुकसान केले नाही. या अर्ध्या तासाच्या थरार नाट्यात सावंत कुटुंबियांनी साक्षात काळ अनुभवला. सध्या माणगाव खोऱ्यात हत्तींचा वावर वाढल्याने ग्रामस्थांना वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)