शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांची सभा म्हणजे ‘फ्लॉप शो’

By admin | Updated: February 15, 2017 23:07 IST

नीतेश राणे यांची टीका : केवळ अडीच हजारांची उपस्थिती अपमानास्पद बाब

कुडाळ : मुख्यमंत्र्यांच्या सभेला सिंधुदुर्गातील भाजपमार्फत केवळ अडीच हजारांची उपस्थिती म्हणजे पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केलेला अपमान आहे. ही सभा म्हणजे भाजपचा फ्लॉपशो असल्याची टीका काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी केली. तसेच जाहीर सभा कशी घ्यायची असते, हे शिकण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कुडाळ येथे १७ फेबु्रवारी रोजीच्या काँग्रेस प्रचार सभेला यावे, आम्ही जागा ठेवू, असा सणसणीत टोलाही त्यांनी भाजपला लगावला.कुडाळ येथे काँग्रेसचे आमदार नीतेश राणे व जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांच्या सभेतील उपस्थिती आणि काँग्रेसच्या सभेची माहिती दिली. यावेळी कुडाळ तालुकाध्यक्ष सतीश साळगावकर, उपतालुकाध्यक्ष सुनील भोगटे, नगराध्यक्ष विनायक राणे, उपनगराध्यक्ष अनंत धडाम, नगरसेवक सुनील बांदेकर, नगरसेविका संध्या तेरसे, साक्षी सावंत, सुप्रिया मांजरेकर, सरोज जाधव, राकेश कांदे व काँग्रेसचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी नीतेश राणे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री राज्यातील भाजपचे प्रमुख चेहरा आहेत. अशावेळी त्यांच्या जाहीर सभेला केवळ अडीच हजारच माणसे उपस्थित राहिली, हे चित्र जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची वास्तव अवस्था दर्शविणारे आहे. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांसह भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी आत्मचिंतन करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.यावेळी दत्ता सामंत म्हणाले, १७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता काँग्रेसची जाहीर सभा होणार आहे. या सभेत माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते नारायण राणे, माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे हे मार्गदर्शन करणार असून, जिल्ह्यातील पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. दोन वर्षांपूर्वी मालवण येथे केलेलेच भाषण भाजपच्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा केले. शिवाय त्यांनी जिल्ह्यातील कोणत्याच प्रश्नाबाबत भाषणातून मत व्यक्त केले नाही, त्यामुळे जिल्हा विकासाचे व्हिजन कसे असेल, याची प्रचितीही दिली. माजी मुख्यमंत्री नारायण राणेंवर खोटेनाटे आरोप करून खासदार, आमदार, पालकमंत्री झालेल्यांनी कोणताच विकास केला नाही. खासदारांनी तर ‘खंबाटा’ प्रकरणात ४०० कोटी रूपयांचा भ्रष्टाचार करून कामगारांना देशोधडीला लावले. आता या निवडणुकीत जनता केलेली चूक सुधारणार असून काँग्रेसच्या पाठिशी भक्कम उभी राहणार आहे, असे सांगत या सभेत काँग्रेसचा जाहीरनामाही प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.भाजपच्या सभेची वेळ होऊन देखील सभेला कोणीच नसल्यामुळे चक्क मुख्यमंत्र्यांना पाऊण तास थांबावे लागले. जे पदाधिकारी सभेला माणसे आणू शकत नाहीत, ते मतदानासाठी कसे आकर्षित करणार? याचाही विचार भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी करावा, असेही नीतेश राणे यांनी यावेळी सुचविले. (प्रतिनिधी)