शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांची रत्नागिरीतील सभा इतरत्र ‘लाईव्ह’

By admin | Updated: November 17, 2016 22:06 IST

पहिला दौरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा होत आहे.

रत्नागिरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २0 रोजी रत्नागिरीत तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे २१ रोजी चिपळूणमध्ये प्रचारासाठी येत आहेत. मुख्यमंत्र्यांची रत्नागिरीत होणारी सभा दापोली, चिपळूण, खेड आणि राजापूर या चार शहरांमध्ये ‘लाईव्ह’ दाखवली जाणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी दिली.आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात नगर परिषद निवडणुकांचा प्रचार वैयक्तिक संपर्कावरच सुरू आहे. आता मतदानाला शेवटचा आठवडा शिल्लक राहिल्याने येत्या आठवड्यात अनेक नेत्यांचे दौरे जिल्ह्यात होणार आहेत. त्यात पहिला दौरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा होत आहे.रविवार २0 रोजी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री फडणवीस यांची रत्नागिरीतील कै. प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे जाहीर सभा होणार आहे. ही सभा जिल्ह्यातील पाचही नगर परिषदांसाठी होत असून, ती उर्वरित चार ठिकाणी म्हणजेच दापोली, खेड, चिपळूण आणि राजापूरमध्ये थेट दाखवली जाणार आहे. त्यासाठी हायटेक यंत्रणा उभारण्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे, असेही माने यांनी सांगितले.मुख्यमंत्र्यांपाठोपाठ सोमवारी २१ रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे प्रचार सभेसाठी चिपळूणला येणार आहेत. भाजप या निवडणुकीत स्वबळावर रिंगणात उतरला आहे. त्यामुळे अधिकाधिक कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असल्याने स्थानिक पातळीवर प्रतिसादही चांगला मिळत आहे. आता दोन महत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे होत असल्याने कार्यकर्त्यांमधील उत्साह दुणावला असल्याचे त्यांनी सांगितले.रत्नागिरीतील सभेची जोरदार तयारी सुरू झाली आहे. या सभेला फडणवीस यांच्यासोबत शिक्षण मंत्री विनोद तावडे हेही उपस्थित राहणार आहेत. या प्रचार सभेमुळे रत्नागिरीतील वातावरण भापजला अधिक पूरक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)