शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसपाटलाला बांद्यात बेदम चोप

By admin | Updated: January 19, 2017 23:13 IST

युवतीची छेडछाड : पोलिसांच्या दिले ताब्यात

बांदा : गोव्यातून बांद्यात दुकानात काम करण्यासाठी येणाऱ्या युवतीचा सातत्याने पाठलाग करून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करणारा कवठणी (ता. सावंतवाडी) गावचा पोलिस पाटील व बांदा येथील बीएसएनएलच्या विभागीय कार्यालयात कंत्राटी कामगार म्हणून काम करीत असलेला रघुनाथ ऊर्फ एकनाथ मायगो जाधव (वय ३८, रा. कवठणी-जाधववाडी) याला बांद्यात ग्रामस्थांनी बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. युुवतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत रघुुनाथ जाधवयाला गुरुवारी सायंकाळी उशिरा अटक केली. यावेळी बांद्यात आलेल्या बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बांदावासीयांच्या रोषाला सामोरे जावे लागले.तक्रारदार युवती ही बांदा येथील एका ब्युटीपार्लरमध्ये काम करते. महाराष्ट्र-गोवा राज्यांच्या सीमेलगत असलेल्या गावातून दररोज ती बांदा येथे आपल्या चुलत बहिणीसोबत बसने प्रवास करते. गेले तीन महिने रघुुनाथ जाधव हा आपल्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत असल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे. रघुुनाथ हा गेली १५ वर्षे बांदा येथील बीएसएनएलच्या कार्यालयात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे, तसेच गेली काही वर्षे तो कवठणी गावाचा पोलिस पाटील म्हणून कार्यरत आहे. गावातदेखील त्याच्याविरोधात बऱ्याच तक्रारी आहेत.युवतीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बसमधून बांदा येथे येताना रघुनाथ हा मुद्यामहून बसमध्ये येऊन माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा. आपण याला कंटाळून बसदेखील बदलली, मात्र रघुनाथ आपला पिच्छा सोडत नव्हता. बुधवारी बसमधून उतरत असताना त्याने आपल्याला रोखायचा प्रयत्न केला. मात्र, आपण बसमधून उतरून कसेबसे ब्युटीपार्लर गाठले. मात्र, तो पाठलाग करत तेथपर्यंत आल्याने आपण याची कल्पना ब्युटीपार्लरमधील इतरांना दिली. तसेच त्याला जाबही विचारला. बांदा पोलिसांनी युवतीच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करत रघुनाथ याच्यावर अटकेची कारवाई केली. अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक तुकाराम हळदणकर करीत आहेत. रघुनाथ याला शुक्रवारी सावंतवाडी येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)बीएसएनएलच्या बांदा कार्यालयाला घेरावस्थानिकांनी बीएसएनएलच्या बांदा विभागीय कार्यालयात घेराव घालत रघुनाथ याला बेदम मारहाण केली. तसेच जोपर्यंत कंपनीचे वरिष्ठ अधिकारी येत नाहीत, तोपर्यंत त्याला कोंडून ठेवण्याचा इशारा दिला. त्यानंतर कनिष्ठ अभियंता डी. जे. जाधव व आय. व्ही. जाधव कार्यालयात दाखल झाले. स्थानिकांनी त्यांना धारेवर धरले. तसेच रघुुनाथला तत्काळ सेवेतून कमी करण्याची मागणी केली. त्यावेळी रघुनाथला काढून टाकल्याचे अभियंता जाधव यांनी सांगितल्याने जमाव शांत झाला.