शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

बालेकिल्ल्यात सेनेला कडवे आव्हान

By admin | Updated: September 23, 2014 00:17 IST

पक्षातील नाराज गटाबरोबरच विरोधकांचा सामना करावा लागणार

शिवाजी गोरे -दापोली-- दापोली तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गेली २५ वर्षे शिवसेनेचे आमदार सूर्यकांत दळवी या मतदारसंघात निवडून येत आहेत. यावेळी ते षटकार मारण्यासाठी इच्छुक आहेत. परंतु यावेळी त्यांना पक्षातील नाराज गटाबरोबरच विरोधकांचा सामना करावा लागणार असल्याने शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच विजयासाठी त्यांना यावेळी कसरत करावी लागणार आहे.दापोली तालुका हा कधी काळी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. परंतु १९९०च्या निवडणुकीत विद्या बेलोसे या काँग्रेसच्या उमेदवाराविरोधात अ‍ॅड. बाळ बेलोसे यांनी बंडखोरी केली. पती- पत्नीच्या वादात शिवसेनेला लॉटरी लागली. तेव्हापासून आजतागायत शिवसेनेने पराभव पत्करला नाही. सलग पाचवेळा दापोली विधानसभा मतदारसंघातून आमदार सूर्यकांत दळवी विजयी होत गेले. आता षटकार मारण्याच्या तयारीत असतानाच पक्षातून बाहेर पडलेले राष्ट्रवादीचे संजय कदम, किशोर देसाई, मनसेचे वैभव खेडेकर यांनी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. आमदार दळवी यांना या निवडणुकीत पक्षातून बाहेर पडलेल्या एकेकाळच्या सहकाऱ्यांशी सामना करायचाच आहे, त्याचबरोबर पक्षातील नाराज गटावरसुद्धा मात करावी लागेल. पक्षाची निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे हाताळणारे भगवान घाडगे, प्रदीप सुर्वे, राजेंद्र फणसे हे निष्ठावंत शिवसैनिक यावेळी बरोबर नाहीत. त्यांच्या मदतीशिवाय निवडणूक लढायची आहे. त्यांच्या नाराजीचा निवडणुकीत परिणाम जाणवेल. विशेष म्हणजे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांची मर्जी ते कशा प्रकारे राखतात, यावर बरंच काही अवलंबून आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांनी दापोली विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे कदम यांना तिकीट न मिळाल्यास कदम गट कितपत मदत करतो, यावर बरंच काही अवलंबून आहे. यावेळी कुणबी समाजाने स्वतंत्र उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतल्यामुळे याचा बराचसा फटका शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे.काँग्रेसला दापोली विधानसभा मतदारसंघात २५ वर्षे अपयश येत असल्याने या मतदारसंघावर राष्ट्रवादीने दावा केला. हे दोन स्पर्धक एकेकाळचे शिवसैनिक असल्याने शिवसेनेची राजनीती त्यांना अवगत आहे. काँग्रेसने हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडला नाही, तरी राष्ट्रवादीचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभा राहण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून सुजित झिमण यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. आघाडीचा कोण उमेदवार असेल, यावर बरंच काही अवलंबून आहे. दोन्ही पक्ष आघाडीचा धर्म किती पाळतात, यावर शिवसेनेची गणिते ठरणार आहेत.शिवसेना-भाजप युती आता अटीतटीच्या ठिकाणावर पोहोचली आहे. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते, मतदार शिवसेनेच्या पाठीशी उभे राहतात का, यावरही शिवसेना उमेदवाराचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.