शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
4
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
5
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
6
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
7
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
8
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
9
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
10
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
11
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
12
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
13
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
14
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
15
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
16
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
17
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
18
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
19
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
20
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलावंतांना संधी देणार : चव्हाण

By admin | Updated: June 6, 2014 00:09 IST

रामचंद्र कुडाळकर ल्ल तळवडे : सिंधुदुर्ग जिल्हा हा कलावंतांचा जिल्हा आहे.

रामचंद्र कुडाळकर ल्ल तळवडेसिंधुदुर्ग जिल्हा हा कलावंतांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यातील नाट्यकर्मी व इतर क्षेत्राची आवड असणार्‍या कलावंताना दूरदर्शन मालिका किंवा इतर क्षेत्रात काम करण्याची सुवर्णसंधी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कलावंताना हिंदी तसेच दूरदर्शन मालिकेत काम करण्याची सुवर्णसंधी मिळवून देणार असल्याचे मत निर्माता अनिल चव्हाण यांनी व्यक्त केले.ते चित्रपटाच्या चित्रीकरणाचा अभ्यास करण्यासाठी सिंधुदुर्गात आले असता ‘लोकमत’शी बोलत होते.अनिल चव्हाण हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. ते फिल्मनिर्माता आहेत तसेच अनेक मालिका त्यांनी तयार केल्या आहेत. त्यांचे शिक्षण वेंगुर्ले तालुक्यातील खर्डेकर महाविद्यालयात झाले असून मुंबईला गेल्यावर ते फिल्म उद्योगात उतरले.या क्षेत्रात त्यांनी बरेच परिश्रम केले. त्यांनी आतापर्यंत सह्याद्री वाहिनीवरील रंगबहार, मनोरंजन, दुर्गा, अग्निपरिक्षा तसेच मी मराठी वाहिनीवरील 'एक झोका नियतीचा' या दर्जेदार मालिकांची निर्मिती केली. मराठीतील नामवंत दिग्दर्शक पितांबर काले यांनी चाळीसच्यावर चित्रपटाचे दिग्दर्शन केले. त्यांना घेऊन मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. या चित्रपटात वेंगुर्लेतील नाट्य अभिनेत्री शोभा मांजरेकर मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे.या मराठी व हिंदी कलाकारांसोबत काम करण्याची संधी कोकणातील कलाकारांना प्राप्त होणार आहे, त्याचप्रमाणे हिंदी मालिकेच्या कथापटकथेवर काम सुरु आहे. दूरदर्शनच्या प्राथमिक मान्यतेनंतर मुंबई, कोल्हापूर, कोकण व गोवा येथे मालिकेच्या चित्रीेकरणाला प्रारंभ होणार आहे. या मालिकेत कोकणातील नामवंत कलाकार जया गोरे, वासुदेव जंगम, शोभा मांजरेकर, गिताली मातोंडकर, सुजाता शेलटकर, वृंदा केळकर या कलाकारांना काम करण्याची संधी मिळणार आहे.निर्माता अनिल चव्हाण यांचा सिनेक्षेत्रातील प्रवास विलक्षण आहे. कोणाच्याही मदतीचा हात न घेता किंवा पाठबळ नसताना केवळ स्वत:वरील आत्मविश्वास व जिद्द याच्या जोरावर व देवावरील श्रद्धा, जे काम करायचे ते प्रमाणिकपणे अशी त्यांची मनोवृत्ती आहे. त्यांनी शून्यातून विश्वनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कोकणातील श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी चित्रपटात कोकणातील अनेक कलाकारांना काम करण्याची संधी उपलब्ध करुन दिली. त्याचप्रमाणे या चित्रपटात त्यांनी कार्यकारी निर्माताची भूमिका बजावली. या मालिकेच्या निर्मितीमुळे येथील जिल्ह्यात स्थानिक कलावंताना काम करण्याची संधी मिळाली असून इथल्या पर्यटन विकासालाही मोलाचे सहकार्य मिळणार आहे. येथील पर्यटन विकासाला विविध चित्रपट, मालिका यांच्या शूटिंंगमुळे चालना मिळणार आहे.