शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

चौकेत कारला दुचाकीची धडक

By admin | Updated: July 17, 2016 23:47 IST

अपघातात चालक गंभीर जखमी : कासारटाका मार्गावर पोलिस बंदोबस्त हवा

मालवण : चौके-कुडाळ मार्गावर चौके पेट्रोलपंपानजीक भरधाव मोटारसायकलने कारला समोरून धडक दिल्याची घटना घडली आहे. कासारटाका येथून मालवणच्या दिशेने भरधाव वेगाने चालवत असलेल्या मोटारसायकलस्वाराने मालवणहून कुडाळकडे जाणाऱ्या कारला समोरून धडक दिली आहे. यात मोटारसायकलचे नुकसान झाले असून कारच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. अपघातात मोटारसायकलस्वार रुपेश लांबोर (मालवण) याला गंभीर दुखापत झाली आहे. याबाबत कारचालक सौगंधराज बादेकर यांनी मालवण पोलिसात तक्रार दिली आहे. ही घटना रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, अपघातात दुचाकी चालकाची चूक असतानाही लांबोर हा कारचालकाच्या अंगावर धावून गेला होता. त्यावेळी त्या मार्गावरून जाणाऱ्या काही तरुणांनीही त्याला साथ केली. मात्र गंभीर जखमी झालेल्या लांबोर याला मालवणातील तरुणानी रिक्षेतून मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातानंतर काहीकाळ वाहतूक खोळंबली होती. घटनास्थळी पोलिसांनी जावून पंचनामा केला. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत पोलिसी कार्यवाही सुरु होती. पावसाळी हंगाम सुरु झाला की धामापूर कासारटाका मार्गावर मद्यधुंद युवकांचा धुडगूस सुरु असतो. मद्यपानात आपापसात मारामारीचेही प्रकार घडले असून गंभीर अपघातही घडले आहेत. कासारटाका येथे रविवार, बुधवार, शुक्रवार या तीन वारांना मोठी गर्दी असते. त्यामुळे अरुंद रस्त्यावर वाहतूक कोंडीचाही मोठा प्रश्न उद्भवतो. त्यामुळे पोलिसांनी याकडे गांभिर्याने पाहून कासारटाका येथे पोलिस बंदोबस्त तैनात ठेवावा, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)