शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत साचेबद्धता टाळणाऱ्या गप्पा-टप्पा

By admin | Updated: October 4, 2015 23:34 IST

‘आम्ही मैत्रिणी’ ग्रुप : सुस्थापितांनी व्यक्त होण्यासाठी जोपासला छंद

कणकवली : तुम्ही नोकरी करता? हो सर्वच करतात. पण मग तुम्ही वेगळे काय करता? या प्रश्नाला उत्तर देताना आणि स्वचा शोध घेताना आपापल्या क्षेत्रात सुस्थापित युवकांनी ‘गप्पा-टप्पा’चा कविता-गाण्यांच्या सादरीकरणाचा मार्ग निवडला. कणकवलीतील ‘आम्ही मैत्रिणी’ गु्रपचाही हा आयोजनातील पहिलाच प्रयत्न होता. येथील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात शनिवारी हा कार्यक्रम झाला. आदित्य बर्वे, केदार फडके, अंबरीश देशपांडे, प्रतीक रानडे, विनीत देशपांडे आदींचा हा ग्रुप आहे. यातील फक्त आदित्य बर्वे हा पेशाने संगीतकार, गिटारवादक आहे. काही चित्रपट, मालिकांसाठी त्याने काम केले आहे. इतरांमध्ये कोणी सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे तर कोणी ग्राफिक डिझायनर म्हणून कार्यरत आहे. मात्र, सर्वांनी कलाक्षेत्रातील आपली आवड जोपासण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. स्वत:मधील कलेला वाव देताना या मित्रांनी सन २००८पासून ‘बरस रे’ नावाचा कार्यक्रम सुरू केला. तो टिपीकल गीतगायनाचा कार्यक्रम होता. त्यानंतर अंबरीश देशपांडे याने स्वत:चे कविता लेखन सुरू केले. त्याचे ‘शब्दात माझ्या’ आणि ‘नाते शब्दाचे’ असे दोन कवितासंग्रह आहेत. यानंतर मागील वर्षी एप्रिलमध्ये ‘गप्पा-टप्पा’ या कार्यक्रमाचा जन्म झाला. आतापर्यंत या कार्यक्रमाचे पंधराहून अधिक शो झाले आहेत. आदित्य बर्वे म्हणाला की, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला हवे तसे व्यक्त होता येते. संगीताबद्दल प्रयोग करता येतात जे सिनेमात करता येत नाहीत. गिटार-तबला, संवादिनी-गिटार असेही फ्यूजन होते. केदार फडके म्हणाला की, कार्यक्रमाचे वेगळेपण म्हणून आम्ही फेसबुकवरून रसिकांशी संपर्क करून त्यांच्या आवडी -निवडीवरून कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्याचाही प्रयोग केला.या ग्रुपमधील बहुतेक जण आपली नोकरी-धंदा सांभाळून काम करतात. त्यामुळे बहुतांश शनिवार-रविवारी कार्यक्रम घ्यावा लागतो. तसेच ग्रुपमधील कलाकारही त्याप्रमाणे बदलतात, असे फडके यांनी सांगितले. नोकरी-व्यवसाय सांभाळून शो करताना कसरत होते. परंतु, कलेच्या सादरीकरणाचा फायदा आम्हाला आमच्या क्षेत्रात काम करतानाही होतो, असे संवादिनी वादक केदार फडके याने सांगितले. (प्रतिनिधी)संविता आश्रमाला मदत देणार : हर्षा दीक्षित हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या येथील ‘आम्ही मैत्रिणी’ ग्रुपचा हा पहिलाच प्रयत्न होता. गु्रपच्या हर्षा दीक्षित, वैशाली गणपत्ये, प्रीती करंबेळकर, अनुश्री जोशी, मानसी आपटे, अमृता मराठे, श्रेया मराठे आदी मैत्रिणींनी सांस्कृतिक कार्यक्रमातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न आहे. या कार्यक्रमातून जमा होणाऱ्या निधीचा काही भाग ‘संविता आश्रम’ या संस्थेला देणार असल्याचे सांगितले. यापुढेही वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम सादर करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे गु्रपच्या हर्षा दीक्षित म्हणाल्या.