शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

चार्मिंग लेडीचा सिमरन बजाजीना बहुमान

By admin | Updated: March 9, 2017 18:24 IST

सोनल साळगावकर उपविजेत्या : मिळून सा?्या जणी महिला मंचचे आयोजन

चार्मिंग लेडीचा सिमरन बजाजीना बहुमानसोनल साळगावकर उपविजेत्या : मिळून सा?्या जणी महिला मंचचे आयोजन---------- कणकवली : येथील मिळून सा?्याजणी महिला मंचच्यावतीने मातोश्री मंगल कार्यालयात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बुधवारी चार्मिंग लेडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत चार्मिंग लेडीचा बहुमान सिमरन बजाजी यांनी मिळविला. तर सोनल साळगावकर या स्पर्धेत उपविजेत्या ठरल्या आहेत. या स्पर्धेत 'विशेष बुध्दिमान' म्हणून सुप्रिया बारवकर यांना गौरविण्यात आले. उत्कृष्ट कॅटवॉक अन्वी समीर हर्णे, उत्कृष्ट पोशाख मंजिरी वारे तर मिळून सा?्या जणी विशेष पुरस्कार पूजा कुमार(झारखंड) यांना देण्यात आला. या स्पधेर्साठी कोरिओ ग्राफर म्हणून संतोष पूजारे तर परीक्षक म्हणून सुमन कदम व हेमा सुर्वे यांनी काम पाहिले.या स्पर्धेत सुवर्णा आरोलकर, समृध्दि राऊळ, ईशा कांबळे, साक्षी बाईत, सई माणगावकर यानी सहभाग नोंदविला होता.शहरातील साईं कृपा बचत गटाला यावेळी 'उद्योगिनी पुरस्कार' देण्यात आला. तसेच विशेष कर्तुत्ववान महिला म्हणून शीतल संतोष सावंत यांना कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा माधुरी गायकवाड़, नगरसेविका राजश्री धुमाळे, माजी नगरसेविका समृध्दि पारकर, नीलम सावंत- पालव आदी उपस्थित होत्या. संदेश पारकर तसेच उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना महिलांना शुभेच्छा दिल्या.यावेळी उपस्थित महिलांनी विविध उपक्रमातुन सर्वांगसुंदर कलागुणांचा आविष्कार केला. तसेच उपस्थित रसिकांची वाहवा मिळविली. यामध्ये सुमेधा अंधारी, शैला अंधारी, स्नेहा अंधारी, साक्षी अंधारी, सरिता अंधारी, मनीषा सापळे, शीतल सापळे, मानसी सापळे, गिरिजा मुंज यांनी तलवार डान्स सादर केला.शीतल मांजरेकर, ईशा कांबळे, कोमल गोसावी, अनीता पवार, प्रियांका कांबळे, रेखा राठोड यांनी तांडव नृत्य सादर केले. स्मिता वालावलकर, मंगल पाटकर, चिन्मयी जाधव, संपदा मालंडकर, नीता मयेकर, रेश्मा वालावलकर, आरती धुरी, भाग्यश्री परब्, श्रुती तांबे आदीनी मिक्स डान्स सादर केला.देविका अंधारी, सलोनी अंधारी, ऋतुजा मेणकुदळे, अंशु सापळे, पोटफोड़े, तन्वी ओरोसकर आदीनी वंदेमातरम गीतावर नृत्य केले.प्रिया सरूडकर, शिल्पा सरूडकर, मंदाकिनी सोळसकर, दर्शना राणे, भाग्यश्री रासम, सेजल पारकर, संगीता परब, दीक्षा पुरळकर, पूजा राठोड, सुखदा गांधी, अंकिता नाईक यांनी रेकॉर्ड डान्स सादर केले. शोभा साटम, नंदा साटम, संगीता राणे, माधुरी मेस्त्री यांनी फनी डान्स केले. कार्यक्रमाच्या सुरुवाती पासूनच चांगला प्रतिसाद लाभला होता. सभागृहात गर्दी झाली होती. विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलानी याठिकाणी मनमोकळेपणाने आनंद लुटला. (प्रतिनिधी)चौकट --आरती पाचंगे प्रथम !याठिकाणी झालेल्या पाककला स्पर्धेत आरती पाचंगे यांनी प्रथम तर उज्वला धानजी यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. साक्षी माळवदे व हर्षदा दीक्षित यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला. या स्पधेर्चे परीक्षण निनाद पारकर यांनी केले.चौकट--आॅन दि स्पॉट चार्मिग लेडी अनीता फराकटे !या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रेक्षकातून आॅन दि स्पॉट चार्मिंग लेडी निवडण्यात आली. हा बहुमान अनीता फराकटे यांना मिळाला. तर उपविजेत्या तन्वी पारकर ठरल्या आहेत.