शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

चोरून फोटो काढणाऱ्यास बदडले

By admin | Updated: September 20, 2015 23:39 IST

सार्वजनिक क्षेत्रातील तो अधिकारी मुंबई येथून बदली होऊन आला होता.

मालवण : शहरातील भरड नाक्यावरील एका चायनीज सेंटरमध्ये बसलेल्या युवतींचा चोरून फोटो काढणे एका सार्वजनिक क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या अधिकाऱ्याच्या अंगलट आला. युवतींच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी त्या अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली. त्यावेळी चायनीज सेंटर मालकाने भाऊगिरीचा सल्ला देत भांडायचे असेल तर रस्त्यावर जावून भांडा असा सल्ला दिला. त्यावेळी त्या युवतींनी व हौशी नागरिकांनी त्या अधिकाऱ्यास रस्त्यावर आणून यथेच्छ बदडले. घटना शुक्रवारी रात्री घडली. सार्वजनिक क्षेत्राशी संबंधित असणारा तो अधिकारी येथील चायनीज सेंटरमध्ये पार्सल नेण्यासाठी आला होता. पार्सलची आॅर्डर दिल्यावर त्याने लगतच्या टेबलवर बसलेल्या युवतींचे आपल्या मोबाईलवरून फोटो काढण्यास सुरुवात केली. त्या युवतींच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी ताडकन उठून त्या अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली. त्यानंतर चायनीज मालकाने रस्त्यावर जावून भांडण्याचा सल्ला दिल्यावर त्या युवतींनी व तेथील हौशी नागरिकांनी तब्बल अर्धा तास बदडले. या युवतींनी प्रकरण न ताणता मनसोक्त धुलाई केल्याचे समाधान झाल्याने त्याला पोलिसात नेण्याचे टाळले. दरम्यान, चोरून काढलेले फोटो त्या युवतींनी तेथेच डिलीट केले. सार्वजनिक क्षेत्रातील तो अधिकारी मुंबई येथून बदली होऊन आला होता. शहरात दिवसभर या प्रकारची जोरदार चर्चा सुरु होती. (प्रतिनिधी)