शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग नियोजित मैदानी स्पर्धा कार्यक्रमामध्ये बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 18:00 IST

मैदानावर पाणी साचल्याने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत सिंधुदुर्ग कार्यालयाच्या वतीने जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धांचे आयोजन दिनांक 23 ते 25 सप्टेंबर या दोन दिवशी घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे नैसर्गिक अडचणीमुळे नियोजित स्पर्धा कार्यक्रमामध्ये बदलसिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धास्पर्धा दिनांक 23 ते 25 सप्टेंबरला

सिंधुदुर्गनगरी दि. 19 : मैदानावर पाणी साचल्याने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत सिंधुदुर्ग कार्यालयाच्या वतीने जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धांचे आयोजन दिनांक 23 ते 25 सप्टेंबर  या दोन दिवशी घेण्यात येणार आहे. 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत या कार्यालयाच्या वतीने जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धांचे आयोजन दिनांक 18 ते 20 सप्टेंबर 2017 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्ग येथे करण्याचे नियोजित होते. परंतु दि. 17 सप्टेंबर 2017 व 18 सप्टेंबर 2017 रोजी ढगाळ हवामान व सतत पाऊस पडत असल्याने दिनांक 18 सप्टेंबर 2017 रोजी मैदानावर पाणी साचले होते.

जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी मैदानाची प्रत्यक्ष पाहणी करुन व उपस्थित तालुका क्रीडा समन्वयक / क्रीडा शिक्षक यांचेशी चर्चा करुन नियोजीत स्पर्धाचे आयोजन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

        जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी उपस्थित क्रीडा समन्वयक / क्रीडा शिक्षक यांचेशी चर्चा करुन जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धा दिनांक 23 ते 25 सप्टेंबर 2017 या दोन दिवशी घेण्याचे सुधारीत नियोजन केले आहे.

या परिपत्रकाव्दारे जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धांचा सुधारीत आयोजन कार्यक्रम पुढील प्रमाणे निश्चित करण्यात येत आहे. दिनांक 23 सप्टेंबर 2017 रोजी 14 व 19 वर्षाखालील मुले व मुली यांच्या स्पर्धा होतील. तर दिनांक 25 सप्टेंबर 2017 रोजी 17 वर्षाखालील मुले व मुली यांच्या स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्ग येथे होतील.

             झालेल्या बदलाची नोंद सहभागी होणारे सर्व खेळाडू, क्रीडा शिक्षक, शैक्षणिक संस्था, पालक यांनी घ्यावी. दि. 19 व 20 सप्टेंबर 2017 रोजी नियोजित स्पर्धा होणार नाहीत. तसेच सुधारीत आयोजन कार्यक्रमानुसार खेळाडू उपसिथत राहतील याबाबत क्रीडा शिक्षक, शैक्षणिक संस्था, पालक यांनी आवश्यक ती कार्यवाही करावी असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यावतीने करण्यात येत आहे.  अधिक माहितीसाठी या कार्यालयाचा ब्लॉग www.dsosindhudurg.blogspot.in येथे पहावे.