सुरेंद्र शिराळकर - आष्टा ,, आष्टा येथील झोपडीत राहणाऱ्या चंद्रकांत फुलसिंग चव्हाण या लमाणी समाजाच्या युवकाने जिद्द, चिकाटीच्या जोरावर गरिबीवर मात करीत संगणकशास्त्र अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. आष्टा व परिसरातील लमाणी समाजातून अभियंता होणारा चंद्रकांत चव्हाण हा पहिला अभियंता आहे.चंद्रकांत चव्हाण हा आष्टा—वडगाव रस्त्यावरील शासकीय जागेत झोपडीत राहणारा युवक. वीस वर्षांपूवी जत तालुक्यातील कुणीकोणूर येथून चव्हाण कुटुंब आष्ट्यात आले. त्याचे आई—वडील परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात मजुरी करून उदरनिर्वाह करतात. परंतु आपल्या मुलाने शिकून मोठे व्हावे, अशी त्यांची प्रबळ इच्छा होती. त्यामुळे स्वत: कबाडकष्ट करून त्यांनी चंद्रकांतला अण्णासाहेब डांगे यांच्या आष्टा येथील प्राथमिक आश्रमशाळेत दाखल केले. शाळेत पहिली ते १0 वीपर्यंत प्रथक क्रमांक त्याने कधीही सोडला नाही. दहावीला त्याला ७९ टक्के गुण मिळाले.दहावीनंतर २00८ मध्ये सांगली येथील शांतिनिकेतन पॉलिटेक्निकमध्ये डिप्लोसाठी त्याने प्रवेश घेतला. २0११ मध्ये संगणकशास्त्रातून डिप्लोमा ७२ टक्क्याने उत्तीर्ण झाला. त्यानंतर इस्लामपूर येथील राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालयात (आरआयटी) साखराळे येथे प्रवेश घेतला.चंद्रकांतने कष्ट व जिद्दीच्या जोरावर हे यश प्राप्त केले आहे. त्याला जिल्हाधिकारी व्हायचे आहे. त्याच्या पंखांना समाजाने बळ दिले आहे. भविष्यातही ते मिळेल, अशी आशा त्याने व्यक्त केली. (वार्ताहर)सर्व्हिसिंग सेंटरमध्ये अभ्यास!चंद्रकांतने सुट्टीच्या दिवशी शेतात काम केले. खोदकाम असो, मुरुमाच्या किंवा दगडाच्या पाट्या उचलणे अशीही कामे त्याने केली. घरात लाईट नसल्याने नजीकच असणाऱ्या प्रा. एस. जी. जाधव यांच्या सर्व्हिसिंग सेंटरच्या खोलीत बसून अभ्यास केला. पदवी परीक्षेत त्याला ६८ टक्के गुण मिळाले. त्याला आई—वडिलांसह प्राचार्य सुषमा कुलकर्णी, प्रा. एस. एस. कुलकर्णी, प्रा. अशोक सरदेशमुख, प्रा. हर्षद दार्इंगडे यांचे मार्गदर्शन मिळाले.
लमाणी समाजातील ‘चंद्रकांत’ बनला संगणक अभियंता!
By admin | Updated: August 5, 2014 00:13 IST