शहरं
Join us  
Trending Stories
1
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
2
"पैसे देणे होत नसेल, तर पत्नी माझ्या घरी आणून सोड"; व्याजाच्या पैशावरून त्रासाने संपवलं जीवन
3
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
4
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
5
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
6
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
7
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
8
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
9
किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
10
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
11
हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video
12
चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!
13
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
14
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
15
Chaturmas 2025 Rangoli: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
16
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
17
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
18
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
19
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
20
कर्नाटकातील अथणीत कार-बसचा अपघात, चौघे ठार; कोल्हापूरहून देवदर्शन करून परतताना काळाचा घाला

सिंधुदुर्गात चाकरमानी दाखल

By admin | Updated: August 26, 2014 23:10 IST

गणेशोत्सवाची लगबग : पावसाच्या संततधारेने तारांबळ

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घरोघरी साजरा होणारा गणेशोत्सव आता दोन दिवसांवर आल्याने उत्सवासाठी लगबग सुरू झाली आहे. मुंबईतून दररोज हजारो भाविक गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे, एस.टी. महामंडळाच्या बस अथवा खासगी गाड्यांनी सिंधुदुर्गात दाखल होत आहेत. मंगळवारपासून भाविकांच्या गर्दीने बाजारपेठा फुलू लागल्या आहेत.दरम्यान, मागील आठवड्यात काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी सायंकाळपासून मेघगर्जनेसह दमदारहजेरी लावल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली आहे. येत्या ४८ तासांत कोकण परिसरात मुसळधार पर्जन्यवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घराघरांत गणेशोत्सव साजरा केला जातो. या उत्सवासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने दरवर्षी न चुकता दाखल होतात. दीड, पाच, सात, अकरा, सतरा, एकवीस दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. सिंधुदुर्गात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणारी मंडळे फार कमी आहेत. मात्र, घरोघरी श्री गणेश पूजन केले जाते. गेला महिनाभर या उत्सवाची करण्यात येणारी पूर्वतयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दीप्रत्येक ठिकाणच्या आठवडा बाजारपेठा आणि महत्त्वाच्या ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये सध्या ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे. त्यातच पावसाने सुरुवात केल्यामुळे लोकांची तारांबळ उडत आहे. मात्र, असे असले तरी भाविक बाजारपेठेत गर्दी करून खरेदी करत आहेत.