शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

खलाशांवर चाकूहल्ला

By admin | Updated: April 25, 2015 01:09 IST

साथीदारास अटक : जखमींवर रुग्णालयात उपचार

मालवण : रवी जनार्दन परब (वय ४२, रा. देवगड दहिबाव) आणि दामोदर बाबली वेंगुर्लेकर (वय ६०, रा. कोळंब खालचीवाडी) या दोन खलाशांवर साथीदार राजू वामनराव सुरूलकर (रा. पोहा, ता. कारंजलाड, जि. वाशिम) याने गुरूवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास दारूच्या नशेत शिवीगाळ करीत चाकूचे वार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी राजू सुरूलकर याला मालवण पोलिसांनी अटक केली आहे. जखमी रवी जनार्दन परब याला गोवा- बांबुळी येथील रूग्णालयात दाखल केले असून या हल्ल्यात किरकोळ जखमी झालेले दामोदर वेंगुर्लेकर हे मालवणच्या ग्रामीण रूग्णालयात उपचार घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जानू राजाराम सावजी यांचा ब्रह्मयोगी नावाचा ट्रॉलर मालवण बंदर जेटीनजिकच्या समुद्रात उभा करून ठेवला होता. या ट्रॉलरवर दामोदर बाबली वेंगुर्लेकर, रवी जनार्दन परब आणि राजू वामनराव सुरूलकर हे तीन खलाशी होते. ट्रॉलरवर जेवण बनविल्यानंतर या खलाशांमध्ये वादावादी झाली. या वादात राजू सुरूलकर मच्छीमारी जाळी कापण्यासाठी वापरण्यात येणारा चाकू हातात घेऊन दारूच्या नशेत रवी याच्या छातीवर वार केले तर त्याच्यासोबत असणाऱ्या दामोदर वेंगुर्लेकर याच्यावरही हल्ला चढविला. या हल्ल्यात रवी परब याला गंभीर दुखापत झाली तर दामोदर वेंगुर्लेकर हे किरकोळ जखमी झाले. जखमी झालेल्या या दोघांनाही मालवणच्या ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. रवी परब याची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्याला अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. याबाबत दामोदर बाबली वेंगुर्लेकर यांनी मालवण पोलिसात माहिती दिली आहे. पोलिसांनी संशयित आरोपी राजू सुरूलकर याला अटक केली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक विश्वजीत बुलबुले यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल परूळेकर अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)