शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राकडून निर्मल ग्राम पुरस्कार योजना बंद

By admin | Updated: November 21, 2015 00:25 IST

स्वप्न धुसर

सिंधुुदुर्गनगरी : जिल्ह्यातील १०० टक्के निर्मल झालेल्या ग्रामपंचायतींना दिला जाणारा ‘निर्मल ग्राम पुरस्कार’ केंद्र शासनाने बंद केल्यामुळे या पुरस्काराअंतर्गत ग्रामपंचातींना मिळणारी लाखो रुपयांची रक्कम बंद होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निर्मल होणाऱ्या ९२ ग्रामपंचायतींना याचा फटका बसला आहे. संपूर्ण स्वच्छता अभियान व निर्मल भारत अभियानाअंतर्गत ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छतेचे सातत्य राखण्यासाठी व स्वच्छताबाबत लोकचळवळ निर्माण करण्यासाठी सन २००३ पासून निर्मलग्राम पुरस्कार योजना केंद्र शासनामार्फ त राबवण्यात येत होती. ज्या ग्रामपंचायती निर्मल होतील त्यांना शासनाच्यावतीने लोकसंख्येच्या आधारावर पुरस्काराची रक्कम दिली जात होती. यामध्ये १ हजारपेक्षा कमी लोकसंख्येस १ लाख रक्कम, दोन हजारापर्यंत २ लाख रूपये व १० हजार लोकसंख्येमागे १० लाख रूपये असे या बक्षीसाचे स्वरूप होते. ही सर्व रक्कम ग्रामपंचायतींना देण्यात येत होती. ही रक्कम विकास योजनांवर खर्च करण्यात येत होती. जिल्ह्यातील ३४० ग्रामपंचायती या निर्मल ग्राम झाल्या असून ९२ ग्रामपंचायतीचा निर्मल होणे बाकी आहे.त्यांना आता बक्षीसाच्या रकमेचा लाभ मिळणार नाही. (प्रतिनिधी)स्वप्न धुसरकें द्र शासनाने निर्मल झालेल्या ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या रोख रक्कमरूपी पुरस्काराची योजना बंद केल्याने जिल्ह्यातील निर्मल होणे बाकी असलेल्या ९२ ग्रामपंचायती निर्मल होण्यासाठी उत्स्फूर्त सहभाग घेतील की नाही यात शंका निर्माण होत आहे. निर्मल झालेल्या ७८.७० टक्के ग्रामपंचायतींनी पुरस्कारांच्या आशेने या ग्रामपंचायती निर्मल केल्या. मात्र शासनाने निर्मलग्राम पुरस्कार योजनाच बंद केल्याने जिल्हा निर्मल होण्याचे स्वप्न जवळ जवळ भंगले आहे.