शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक आरोग्य केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे लावणार

By admin | Updated: December 4, 2014 23:39 IST

आरोग्य समिती सभेत निर्णय : अंतिम मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेत

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय डॉक्टरांना वारंवार होणाऱ्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्यकेंद्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी आरोग्य समिती सभेत याची मान्यता घेऊन अंतिम मान्यतेसाठी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत पाठविण्यात आला आहे.जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा येथील बॅ. नाथ पै समिती सभागृहात पार पडली. यावेळी समिती सदस्य प्रमोद कामत, भारती चव्हाण, जान्हवी सावंत, रेश्मा जोशी, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. नामदेव सोडल, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.जिल्ह्यात प्राथमिक आरोग्यकेंद्रे आदींमधील डॉक्टर्सना सातत्याने मारहाण करण्याचे प्रकार घडत आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यात वाढलेल्या चोऱ्यांचे प्रमाण आदींच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्यकेंद्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय आरोग्य समितीत घेण्यात आला आहे. या निर्णयाला अंतिम मान्यतेसाठी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत ठेवण्यात येणार आहे. सन २०१४-१५ या चालू आर्थिक वर्षासाठी जिल्हा परिषद स्वउत्पन्नातून ४२ लाख रुपयांच्या निधीची जादा मागणी करण्यात आली. यात साथरोग प्रतिबंधक उपाययोजनांसाठी २४ लाख ६५० रुपये, कंत्राटी प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांसाठी ३ लाख २४ हजार रुपये, कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांच्या पगारासाठी १५ लाख रुपये अशा एकूण ४२ लाख ४४ हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे. यावर्षी आतापर्यंत कुटुंबकल्याणअंतर्गत ४६ टक्के काम पूर्ण झाले आहे तर लसीकरणाचे ५० टक्के एवढे काम झाले आहे.क्षयरोगअंतर्गत ११२५ थुंकी नमुने तपासण्यात आले. यात ३५ नमुने दूषित आढळले आहेत तर एचआयव्हीअंतर्गत ३८ रुग्ण आहेत तर कुष्ठरोगाचे ६१ रुग्ण जिल्ह्यात असल्याची माहिती सभेत देण्यात आली तर मलेरियाचे आतापर्यंत १३६ रुग्ण तर डेंग्यूचे ४९ संशयित रुग्ण आढळले होते. तसेच १६ पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहेत. आतापर्यंत ६५ रुग्ण डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ६१ रुग्ण जिल्ह्याबाहेर डेंग्यूची लागण झाल्याचे तर ४ रुग्णांना जिल्ह्यातच डेंग्यूची लागण झाल्याची माहिती देण्यात आली. हे सर्व रुग्ण उपचाराअंती बरे झाले असल्याची माहिती सभेत देण्यात आली.बांधकामे अपूर्ण असलेली आरोग्यकेंद्रे व उपकेंद्रे आदींची कामे प्रथम पूर्ण करावीत तसेच दुरुस्तीचीही कामे तत्काळ पूर्ण करावीत असे आदेश सभापती पेडणेकर यांनी अधिकाऱ्यांना दिले. जिल्हा रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. विजय ढवळे यांना झालेल्या मारहाण प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयी असल्याचा आरोप जान्हवी सावंत यांनी केला. तर सभागृहाच्या भावना पोलीस अधीक्षकांना कळविण्याच्या सूचना पेडणेकर यांनी केल्या. (प्रतिनिधी)