शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

प्रमाणपत्राने केला दोन कोटीचा घोटाळा

By admin | Updated: October 5, 2014 23:03 IST

दोन सहकारी बँकांमध्ये सुवर्णकारांनी दिलेल्या खोट्या प्रमाणपत्राच्या आधारावर

रत्नागिरी : सोनाराच्या खोट्या प्रमाणपत्राने कोकण मर्कंटाईल बँकेमध्ये दोन कोटी ८२ लाख ७७ हजार ६४९ रुपयांचा घोटाळा केला आहे. विशेष म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील बनावट सोने तारणाची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक व भंडारी बँक अशा दोन सहकारी बँकांमध्ये सुवर्णकारांनी दिलेल्या खोट्या प्रमाणपत्राच्या आधारावर झालेला घोटाळा उघडकीस आला होता.सोने तारण ठेवून सहजपणे कर्ज मिळत असल्याने अनेकजण या कर्जालाच पसंती देतात. उर्वरित कर्जांसाठी कागदपत्रांची जंत्री लागत असल्याने तसेच त्यानंतरही कर्जासाठी अनेक अडचणी उभ्या राहात असल्याने सोनेतारण कर्ज हा स्वस्त पर्याय ठरत आहे. मात्र, त्यातही खरे सोने तारण न ठेवता बँकेने नेमलेल्या सुवर्णकाराला हाताशी धरुन त्याच्याकडून खोटे प्रमाणपत्र घेऊन खोट्या सोन्यावरच कर्ज लाटण्याचा डाव बँकेच्या काही ग्राहकांकडून खेळला जात असल्याचे दिसून येते.रत्नागिरीतील रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक व भंडारी बँकेत बनावट सोने तारण ठेवून लाखोंचा अपहार केल्याचे प्रकार काही वर्षांपूर्वी उघडकीस आले होते. त्यानंतर आता कोकण मर्कंटाईल बँकेतही असाच प्रकार उघडकीस आल्याने पुन्हा एकदा सोनेतारण कर्जाविषयी प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.तारण ठेवण्यात येणाऱ्या सोन्याविषयी कर्मचारी व अधिकाऱ्यांना माहिती नसते. त्यामुळेच सुवर्णकाराला नेमले जाते. या सुवर्णकाराकडूनच खोटे प्रमाणपत्र मिळत असल्याने संगनमताने हा कर्जव्यवहार केला जात असल्याचे उघड झाले आहे.विशेष म्हणजे कोकण मर्कं टाईल बँकेत २ कोटी ८२ लाख ७७ हजार ६४९ एवढ्या रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्जवितरण होईपर्यंत हे दागिने खरे वा खोटे याची सोनार तसेच बँक प्रशासनाला माहितीच नसावी, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)कर्जाची भानगड नाहीबनावट सोने तारण ठेवल्याने अनेक फायदे मिळतात. भविष्यात कर्ज बुडाल्यास बँकेच्या नियमाप्रमाणे या दागिन्यांचा लिलाव होतो. तारण ठेवलेलीच वस्तूच खोटी असल्याने ती लिलावात विकली गेल्यास त्याबाबत ग्राहक निर्धास्त असतो. त्यामुळे बनावट सोनेतारण करण्याकडे आता ग्राहकही सराईतपणे धजावू लागले आहेत. विशेष म्हणजे बँक प्रशासनही त्याबाबत बेफिकीर आहे.