शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

‘महाकबड्डी’साठी खेडही प्रयत्नशील ?

By admin | Updated: March 12, 2015 00:03 IST

क्रीडारसिकांना पर्वणी : ‘पशुपतीनाथ ग्रुप’तर्फे होणार स्पर्धेचे आयोजन

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील क्रिडा शौकिनांना मे महिन्यात राज्यस्तरीय महाकबड्डी लिग स्पर्धेचा आनंद लुटता येणार आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी फेडरेशन आणि पुणे येथील पशुपतीनाथ ग्रुृप आॅफ कंपनी यांच्यातील चर्चेनंतर या स्पर्धा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घेण्याबाबत आग्रह धरण्यात आला आहे. विशेषत: खेडमध्ये या स्पर्धा घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत़ खेड येथे झालेल्या या संघटनेच्या पत्रकार परिषदेत याबाबत सहमती असल्याचे सांगण्यात आले.या स्पर्धा १ ते २३ मेदरम्यान आयोजित करण्यात आल्या असून रत्नागिरी जिल्ह्याचा कबड्डी संघ पुणे येथील पशुपतीनाथ कंपनीने पुरस्कृत केल्याची माहिती कंपनीचे अध्यक्ष अजय चिंगळे यांच्यावतीने सिध्दार्थ मेहता आणि कंपनीचे संचालक शशांक कदम तसेच सचिन चव्हाण यांनी दिली आहे़ पुणे येथील पशुपतीनाथ ग्रुप आॅफ कंपनीने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. राज्य कबड्डी फेडरेशनशी कंपनीची बोलणी झाल्याची माहिती कंपनीच्या संचालकांनी दिली आहे. क्रिकेटच्या धर्तीवर महाराष्ट्रात अशा प्रकारची ही पहिली स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापुर, बारामती, नाशिक, रायगड, रत्नागिरी आदी १२ संघ सहभागी होणार आहेत.विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये राज्य, राष्टीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कबड्डी खेळाडू सहभागी होणार असल्याने या स्पर्धेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. हे सर्व संघ पुरस्कुत केलेले आहेत. या स्पर्धेमुळे अनेक खेळाडूंना चांगले उत्पन्न कमावण्याची संधीही उपलब्ध झाली आहे. कोकणातील लाल मातीतला हा खेळ असल्याने या स्पर्धा कोकणामध्ये झाल्या पाहिजेत, असा आग्रह कंपनीचा असल्याचे संचालक शशांक कदम यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्ह्याचा संघ अद्याप पुरस्कृत करण्यात आला नव्हता़ पशुपतीनाथ कंपनीनी हा संघ पुरस्कृत केला आहे.विशेष म्हणजे या स्पर्धेतील प्रथम विजेत्यांस ७ लाख रूपयांचे पारितोषिक आणि सुवर्णचषक तसेच उपविजेत्यास ५ लाख रूपये आणि सुवर्णचषक देऊन गौरविण्यात येणार आहे. याबाबत खेड येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली असून लवकरच हा संघ पुरस्कृत करण्याबाबत पावले उचलली जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या बैठकीत पशुपतीनाथ कंपनीचे संचालक शशांक कदम, सचिन चव्हाण यांच्यासह सिध्दार्थ मेहता, साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष सदानंद भोसले, खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश चिकणे उपस्थित होते. (प्रतिनिधी)महिला संघाकडे साऱ्यांचीच पाठरत्नागिरी जिल्ह्याचा पुरूषांचा संघ पुरूस्कृत करण्यात आला असला, तरी आजपर्यंत महिला संघाकडे मात्र साऱ्यांनीच पाठ फिरवली आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा महिलांचा सघ अद्याप पुरस्कृत करण्यात आला नाही. मात्र, हा संघ पुरस्कृत करण्याच्या प्रतीक्षेत येथील काही उद्योजक आहेत.