शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

खडू धरलेला आमदार हवा

By admin | Updated: February 24, 2015 00:01 IST

ज्ञानेश्वर कानडे : माध्यमिक अध्यापक संघ अधिवेशन

टेंभ्ये : विधानपरिषदेत शिक्षकांचे प्रतिनिधित्व करणारे आमदार हे प्रत्यक्षात हातात खडू धरलेले असावेत. शिक्षक म्हणून काम केलेला आमदारच शिक्षकांच्या व्यथा समजावून घेऊ शकतो. शासनाच्या शिक्षणविरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी शिक्षक आमदाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. यासाठी शिक्षकांची व्यथा अनुभवणे गरजेचे असल्याचे माध्यमिक अध्यापक संघाचे राज्य अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे यांनी स्पष्ट केले.माध्यमिक अध्यापक संघाच्या वार्षिक अधिवेशात ते बोलत होते. सध्या शिक्षण क्षेत्रासमोर असणाऱ्या विविध समस्या त्यांनी सभागृहासमोर मांडल्या.कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील, कॉ. गोविंद पानसरे व अन्य दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. माजी आमदार शिवाजीदादा पाटील यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेंद्र अहिरे, माध्यमिक शिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे, ज्येष्ठ शिक्षक नेते सदाशिव चावरे, राम पाटील, बी. डी. पाटील, अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष भारत घुले, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिक्षण सभापती व अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर, लक्ष्मण पावसकर, रत्नागिरी जिल्हा संघटनेचे कार्यवाह अशोक आलमान, माध्यमिक पतपेढीचे अध्यक्ष जगन्नाथ वीरकर, तालुका अध्यक्ष सी. एस. पाटील, कार्यवाह सागर पाटील, एमसीसी समादेशक कदम, विज्ञान पर्यवेक्षक नरेंद्र गावंड, कोकण मंडळ सदस्य रामचंद्र महाडिक उपस्थित होते.सी. एस. पाटील यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थी प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल परीक्षा विभागप्रमुख एकनाथ पाटील यांनी जाहीर केला. शिक्षकांसमोरील समस्या सोडवण्यासाठी संघटना हा एकच पर्याय असल्याचे उद्घाटक शिवाजीदादा पाटील यांनी स्पष्ट केले. शासनाकडे मागितल्याशिवाय काहीही मिळणार नाही. संघटनात्मक शक्तीच शिक्षकाला न्याय देऊ शकते, असे मत व्यक्त केले. यावेळी शिक्षणाधिकारी राजेंद्र अहिरे, गुरुनाथ पेडणेकर, सदाशिव चावरे, राम पाटील, बी. डी. पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष भारत घुले यांनी मनोगते व्यक्त केले. यावेळी विद्यार्थी प्रज्ञा शोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, तालुक्यातील पुरस्कारप्राप्त, पदोन्नतीप्राप्त, सेवानिवृत्त शिक्षक आणि मुख्याध्यापकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. अशोक आलमान यांनी आभार मानले. आय. आय. सिद्धिकी, सागर पाटील, सचिन मिरगल यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)