शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जातनिहाय सर्व्हेत चुका; कुडाळकर हैराण

By admin | Updated: March 19, 2015 23:50 IST

दुरुस्तीसाठी गर्दी : चुका सुधारण्यासाठी अधिकारी पाठविण्याची मागणी

कुडाळ : सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणना २०११च्या यादीत नावांचा घोळ झाल्याने कुडाळ तहसील कार्यालय येथे नावात दुरुस्ती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची बुधवारी गर्दी झाली होती. प्रशासनाच्या चुकीचा त्रास आम्हाला का, असा सवाल करून चुका सुधारण्यासाठी गावागावांत अधिकारी पाठवा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. शासनाने सामाजिक, आर्थिक आणि जातीनिहाय जनगणनेनुसार, प्रत्येक कुटुंंबाची नावे व माहिती यादी केली. या यादीतील माहितीत कोणत्याही प्रकारच्या चुका आहेत का, ते प्रत्येकाने तपासा व यासाठी प्रत्येक गावातील यादी त्या त्या ग्रामपंचायतीत ठेवल्या होत्या. या यादीमध्ये मोठ्या प्रमाणात जनतेच्या नावामध्ये, पत्त्यांमध्ये चुका आढळून आल्या. आता या चुका सुधारण्यासाठी सर्व गावांतील जनतेला कुडाळ तहसील कार्यालयात यावे लागले. सोमवारी चुकांची दुरुस्ती करण्यासाठी आलेल्या कुडाळ तालुक्यातील जनतेने मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी यातील काहीजणांना यासंदर्भात विचारले असता, या यादीमध्ये आम्ही योग्य प्रकारे आमच्या कुटुंबीयांची नावे, पत्ता याची माहिती दिली होती. तसेच अर्जही योग्य प्रकारे भरला होता. परंतु आता प्रसिद्ध झालेल्या या यादीमध्ये आमची नावे, पत्ते चुकलेले आहेत. आमची चूक नसतानाही शासनाच्या चुकीमुळे आम्हाला हा त्रास सहन करावा लागत आहे. (प्रतिनिधी)गावात अधिकारी नेमावेत आम्ही माहिती योग्य देऊनही प्रशासनाने चुकीची नावे, पत्ते लिहिली असून, आता या चुकीची दुरुस्ती करण्याकरिता येथील सामान्य जनतेला वारंवार तालुक्याच्या ठिकाणी येता येणे शक्य होणार नाही.त्यामुळे प्रशासनाने या यादीतील दुरुस्ती करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखून गावागावांत अधिकारी नेमावेत, अशी मागणी केली.