शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

तळेरेच्या वनरक्षकाविरुध्द लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

By admin | Updated: June 4, 2017 01:34 IST

कणकवली पोलिसात तक्रार

कणकवली : वन विभागाकडील प्रशासकीय काम करून देण्यासाठी ७७ हजार ४१0 रुपये लाच मागितल्याप्रकरणी तळेरेचे वनरक्षक राहुल पाटील याच्याविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेले दोन महिने संशयित आरोपी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला हुलकावणी देत आहे. आरोपी सापळ्यात अडकत नसल्यामुळे तक्रारदार मितीश मदन केणी यांनी राहुल पाटील याच्याविरोधात कणकवली पोलिसात तक्रार दाखल केली आहे. प्रशासकीय काम करून देण्यासाठी वनरक्षक राहुल पाटील हा सुभाष गावकर यांच्याकडे ७७ हजार ४१0 रुपयांची मागणी करीत होता. या प्रकरणी मितीश मदन केणी व सुभाष गावकर यांंनी लाचप्रतिबंधक विभागाला कळविले होते. लाच मागण्याचा प्रकार २४ एप्रिल रोजी सकाळी ११.४0 ते १२.१५ दरम्यान घडला होता. त्याचवेळी सुभाष गावकर व मितीश केणी यांनी लाचलुचपत विभाग कुडाळ यांना कळविले होते. लाचलुचपत विभागाने सापळा लावला होता. मात्र राहुल पाटील याला संशय आल्याने तो फोन बंद करीत असे व ठरविलेल्या ठिकाणी येत नसे व सुभाष गावकर यांचे कामही करून देत नव्हता.