शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कासारटाका पर्यटकांच्या गर्दीने हाऊसफुल्ल

By admin | Updated: July 16, 2014 00:25 IST

धबधबे, जलस्त्रोत प्रवाही : धामापूरमधील नवसाला पावणारे देवस्थान

अमोल गोसावी : चौकेअसंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेले मालवण तालुक्यातील धामापूरमधील नवसाला पावणारे देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले श्री देव कासारटाका देवस्थान या आठवड्यापासून पावसामुळे धबधबे आणि इतर जलस्त्रोत वाहू लागल्याने भाविकांच्या आणि पर्यटकांच्या गर्दीने हाऊसफुल्ल दिसू लागले आहे.कोंबडा, बकरा आणि मद्याने नवसफेड होत असल्याने कासारटाक्याला बुधवार, शुक्रवार आणि रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळते. चौके धामापूर मार्गावर गोड्याच्यावाडीनजिक निसर्गाच्या कुशीत रस्त्याकडेला असलेले देवस्थान तसेच धामापूर तलावानजिक असलेले देवस्थान हे दोन्ही देव कासारटाक्याची देवस्थाने असून याठिकाणी पावसाळ््याच्या दिवसात नवस फेडण्यासाठी आणि नवस करण्यासाठी जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील भाविक मोठी गर्दी करीत आहेत. परंतु सध्या श्रद्धेपेक्षा दारू-मटणाची पार्टी करून मजा करण्याचा पिकनिक पॉर्इंट अशा विचाराने अनेक पर्यटक याठिकाणी येतात. त्यातील काही अतिउत्साही तळीराम दारू पिऊन दिवसभर धिंगाणा घालतात. त्याचा त्रास येथून जवळच राहणाऱ्या गोड्याच्या वाडीतील ग्रामस्थांना आणि प्रवाशांना सहन करावा लागत आहे.पोलीस बंदोबस्त अपुरानवसाला पावणाऱ्या कासारटाका देवस्थानची ख्याती दूरवर पसरल्यामुळे याठिकाणी दिवसेंदिवस गर्दीचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे मद्यपी लोकांमुळे वाद होत असतात. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी याठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येतो. परंतु वाढत चाललेल्या गर्दीचा आणि कासारटाका देवस्थानचा विस्तृत परिसर लक्षात घेता याठिकाणी अधिक पोलीस बंदोबस्त आणि फिरता बंदोबस्त ठेवणे ही सध्याची गरज आहे. त्यामुळे या मद्यपींवर अंकुश ठेवता येईल. गेल्या काही वर्षात याठिकाणी दारू पिऊन मौजमजा करून परतीच्या प्रवास करताना अनेक अपघात होऊन काहीजणांना जीव गमवावा लागला आहे. तर अनेकजण जायबंदी झाले आहेत. म्हणून हे दुष्परिणाम रोखण्यासाठी या ठिकाणी नवस फेडण्यासाठी येणाऱ्या भाविकांवर आणि अतिउत्साही पर्यटकांवर निर्बंध लादणे आवश्यक आहे.त्याचप्रमाणे देवस्थान रस्त्यानजिक असल्याने याठिकाणी रस्त्याच्या कडेला वाहनांची रांगच रांग लागलेली असते. त्यामुळे या ठिकाणी दुपारच्यावेळी वाहतुकीचा खोळंबाही होतो. असे असले तरी कासारटाक्याची ख्याती सर्वदूर पसरल्याने याठिकाणी दिवसेंदिवस गर्दी मात्र वाढत आहेत.